गडहिंग्लजला १८२२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजला १८२२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
गडहिंग्लजला १८२२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

गडहिंग्लजला १८२२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

sakal_logo
By

39708
गडहिंग्लज : बॅ. नाथ पै विद्यालयाच्या केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर सोडविताना विद्यार्थी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)

गडहिंग्लजला १८२२ विद्यार्थ्यांनी
दिली शिष्यवृत्ती परीक्षा
१८ केंद्रावर व्यवस्था; पाचवीचे १२०२ तर आठवीचे ६२० विद्यार्थी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : विविध कारणांनी लांबलेली बहुप्रतिक्षित शिष्यवृत्ती परीक्षा आज झाली. गडहिंग्लज तालुक्यातील एक हजार ८२२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये पाचवीच्या (पूर्व उच्च प्राथमिक) १२०२, तर आठवीच्या (पूर्व माध्यमिक) ६२० विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे गतवर्षी पाचवी व आठवीला असणारे हे विद्यार्थी आहेत. परीक्षा लांबल्यामुळे त्यांच्यावर पुढील वर्षांत प्रवेश केल्यानंतर ही परीक्षा देण्याची वेळ आली.
वास्तविक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा होते. पण, कोरोना व अन्य तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा लांबणीवर पडली. मागील शैक्षणिक वर्षात परीक्षा झालीच नाही. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २० जुलै ही तारीख निश्चित केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे महापुराची शक्यता असल्याने पुन्हा तारीख बदलण्यात आली. अखेर आज परीक्षेसाठी मुहूर्त मिळाला. गेले वर्षभर तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गडहिंग्लज तालुक्यात पाचवीसाठी शहरातील गडहिंग्लज हायस्कूल, बॅ. नाथ पै विद्यालयासह एस. एम. हायस्कूल बसर्गे, केंद्र शाळा भडगाव, परिश्रम विद्यालय दुंडगे, केदारलिंग हायस्कूल कडगाव, न्यू इंग्लिश स्कूल नूल, न्यू इंग्लिश स्कूल कौलगे, शिवाजी विद्यालय महागाव, महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी, एसपीजी हायस्कूल नेसरी, विद्या मंदिर सांबरे या केंद्रावर तर आठवीसाठी शहरातील जागृती हायस्कूल, वि. दि. शिंदे हायस्कूलसह हलकर्णी भाग हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल महागाव, एस. डी. हायस्कूल मुत्नाळ, एस. एस. हायस्कूल नेसरी या ठिकाणी बैठक व्यवस्था केली होती.
सकाळी आठला गडहिंग्लज येथून प्रत्येक केंद्रावर पेपर पोचविण्यात आले. सकाळी अकराला मराठी व गणित तर दुपारी दीडला इंग्रजी व बुद्धीमत्तेचा पेपर झाला. पाचवीच्या १२३८ तर आठवीच्या ६४६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यातील अनुक्रमे ३६ व २६ विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून केंद्र बदलून माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केली होती. तर केंद्र संचालक अन्य तालुक्यातील होते. प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन. बी. हलबागोळ, विस्तार अधिकारी आर. आर. कोरवी यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक म्हणून चंद्रकांत जोशी, रवी पाटील, आनंदा आजगेकर यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82522 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..