रोझरी इंग्लीश स्कूलमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोझरी इंग्लीश स्कूलमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा
रोझरी इंग्लीश स्कूलमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा

रोझरी इंग्लीश स्कूलमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धा

sakal_logo
By

ajr315.ipg
आजरा : येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन करताना तहसीलदार विकास अहिर. या वेळी फादर फेलिक्स लोबो, मनवेल बार्देस्कर व अन्य.

रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये
पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू
आजरा, ता. ३१ : येथील रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धेला सुरवात झाली. तहसीलदार विकास अहिर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन आणि क्रीडांगणाचे पूजन झाले. मनवेल बार्देस्कर यांनी स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात शालेय जीवनातील खेळाचे महत्व विषद केले. तहसीलदार अहिर म्हणाले, ‘‘जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेळामुळे जीवन आरोग्यदायी राहते. यातून सांघिक भावना, स्पर्धात्मक वृत्तीबरोबर खिलाडूवृत्तीही जोपासली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात खेळ खेळला पाहिजेत.’’ फादर फेलिक्स लोबो यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेस फेलिक्स लोबो यांचे मार्गदर्शन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. विजय केसरकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष कदम यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82612 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..