
राजाराम महाराज जयंती कार्यक्रम
39838
..........
विविध संस्था - संघटनांतर्फे
राजाराम महाराजांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः कोल्हापूरचे भाग्यविधाते छत्रपती राजाराम महाराज यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. व्हिनस कॉर्नर चौकातील राजाराम महाराजांच्या पुतळ्याला विविध संस्था, संघटनांनी पुष्पहार अर्पण केला.
राजाराम सहकारी साखर कारखाना
छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन चेअरमन दिलीप पाटील यांच्या हस्ते झाले. माजी आमदार अमल महाडिक यांनी राजाराम महाराजांच्या शेती, समाजसेवा आणि कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने केलेल्या कार्याला उजाळा दिला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कारखान्याच्या वाटचालीमध्ये योगदान दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सीपीआरच्या माध्यमातून कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर घेतले. व्हाईस चेअरमन वसंत बेनाडे उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी केले. आभार हरीश चौगुले यांनी मानले.
..
३९८१० ः व्हिनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करताना शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, ॲड. प्रताप जाधव, सुमित डोंगरसाने, रामचंद्र चव्हाण आदी.
मनपा, राजाराम महाराज प्रतिष्ठान
व्हिनस कॉर्नर चौकातील छत्रपती राजाराम महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शहर अभियंता नेत्रदीपक सरनोबत, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, राजाराम महाराज प्रतिष्ठानचे ॲड. प्रताप जाधव, शिल्पकार सुमित डोंगरसाने, रामचंद्र चव्हाण, सहाय्यक अभियंता व्यंकटेश सुरवशे, तुषार भरसट आदी उपस्थित होते. ॲड. प्रताप जाधव यांच्या हस्ते शिल्पकार डोंगरसाने व नेत्रदीपक सरनोबत यांचा सत्कार झाला.
..
राजारामपुरी परिसर
राजारामपुरी जुने मित्र मंडळ, राजारामपुरी विकास मंच व संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजाराम महाराजांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. अनिल घाटगे, प्रा. शिवाजी जाधव, बाबा लिंग्रस, विजय निंबाळकर, अनिल कदम, महादेव पाटील, अमोल जाधव, शर्मिष्ठा सावंत, रघुनाथ शिपुगडे, पोपट साळोखे, रामचंद्र निंबाळकर, संजय जाधव, बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंग्रस, जयराम जाधव, महेश उत्तुरे, ज्ञानदेव जगताप, अभिजीत साठे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82622 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..