राष्ट्रवादी गटबाजी सुधारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी गटबाजी सुधारीत
राष्ट्रवादी गटबाजी सुधारीत

राष्ट्रवादी गटबाजी सुधारीत

sakal_logo
By

३९८५३

राष्ट्रवादीच्या दुफळीवर कोल्हापुरात खलबते
चंदगड मतदारसंघ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर वाचला पाढा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी पक्षातंर्गत वाढलेल्या गटबाजीमुळे घड्याळाचे काटे विस्कटलेले आहेत. त्याच्या ऑपरेशनसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट माजी आमदार संध्यादेवी कुपेकरांच्या कोल्हापुरातील बंगल्यात तब्बल तीन तास ‘विसावा’ घेतला. श्रीमती कुपेकर व डॉ. नंदिनी बाभूळकर उपस्थित होते.
गोकुळ निवडणुकीपासून चंदगड मतदारसंघाच्या राष्ट्रवादीत दुफळी पडली असून प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील यांच्याकडे काही प्रमुख कार्यकर्त्यांनी ही गटबाजी संपविण्याचे साकडे घातले होते. शनिवारी (ता. ३०) प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत श्रीमती कुपेकर यांच्या बंगल्यावर यासंदर्भात बैठक झाली. त्यासाठी मतदारसंघातील कुपेकरांना मानणाऱ्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांची हजेरी होती.
नेत्यांतील दुरावा वाढल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांची गोची झाली असून हा वाद संपवण्याचे आवाहन काही प्रमुखांनी श्री. पाटील यांना केले. बाबा कुपेकरांनी तयार केलेली फळी दुभंगत आहे. ही फळी पुन्हा एकसंध करण्याशिवाय राष्ट्रवादीसमोर पर्याय नाही. नेत्यांच्या अशा भूमिकेमुळे सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. समोर गोडसाखर कारखाना, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. गटबाजीमुळे या निवडणुकांतील उमेदवारीत सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी वेळीच अंतर्गत वादावर पडदा टाकण्याची मागणी झाली. कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेत श्री. पाटील यांनी अंतर्गत कलह मिटवण्यासाठी हसन मुश्रीफ व आमदार पाटील यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही दिली. स्व. कुपेकरांनी उभारलेली राष्ट्रवादी भविष्यातही अखंडीत ठेवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तब्बल तीन ते चार तास श्री. पाटील यांनी या प्रश्‍नासाठी वेळ देऊन पक्ष एकसंघ ठेवण्याची सूचना केली.


प्रसंगी नागपूरला येईन...
श्री. पाटील यांनी ही गटबाजी संपवण्यासाठी डॉ. बाभूळकरांना मतदारसंघात सक्रिय होण्यास सांगून पक्ष बांधणीसाठी महिन्यातून दोन-चार दिवस तरी वेळ देण्याची सूचना केली. सासरच्या मंडळींची मनधरणी करण्यासाठी प्रसंगी मी नागपूरला येईन, असा शब्दही पाटील यांनी दिल्याचे समजते; परंतु डॉ. बाभूळकर यांनी या प्रस्तावावर होकार न देता विचार करण्यास थोडा वेळ मागितल्याची प्रतिक्रिया दिल्याचे समजते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82712 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..