शिवसेना कोश्यारींचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना कोश्यारींचा निषेध
शिवसेना कोश्यारींचा निषेध

शिवसेना कोश्यारींचा निषेध

sakal_logo
By

39877


गडहिंग्लजला सेना,
युवा सेनेची निदर्शने
राज्यपाल कोश्यारींचा केला निषेध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : मुंबईबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत येथील शिवसेना व युवासेनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध नोंदवण्यात आला.
राज्यपाल पद स्वीकारल्यापासून कोश्यारी यांनी वारंवार मराठी माणसांबद्दल व महाराष्ट्राबद्दल चुकीचे विधान करीत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईबद्दल केलेले विधान संतापजनक आहे. या निषेधार्थ शहर व तालुका शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने कोश्यारी यांना ‘कोल्हापुरी’ दाखवून निषेध नोंदवला. यावेळी जिल्हा युवासेना विस्तारक सतीश नरसिंग, तालुकाप्रमुख दिलीप माने, शहरप्रमुख संतोष चिकोडे, उपतालुकाप्रमुख भरत जाधव, उपशहरप्रमुख संदीप कुराडे, महिला उपतालुकाप्रमुख वनिता जाधव, महिला शहरप्रमुख रेखा पाटील, उपशहरप्रमुख स्वरूपा पेंढारकर, युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, शाखाप्रमुख सुशील विभूते, शकील मुल्ला, रोहित डावरे, प्रताप पिलारे, प्रशांत घबाडे, सुमित कोरवी, शशिकांत पाटील, मंथन डांग, राहुल शेलार, स्वप्नील आजरी आदी उपस्थित होते. यावेळी संतोष चिकोडे, दिलीप माने, सतीश नरसिंग यांची भाषणे झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82718 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..