मोहरम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहरम
मोहरम

मोहरम

sakal_logo
By

39808

ख्वाजा गरीब नवाज
पंजा अजमेर भेटीसाठी रवाना
--
बाबूजमाल दर्ग्यात नाल्याहैदर पंजाची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः मोहरमच्या पर्वाला आता प्रारंभ झाला असून विविध ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना होऊ लागली आहे. बाबूजमाल दर्ग्यातील मानाच्या नाल्याहैदर पंजाची आज रात्री उशिरा प्रतिष्ठापना झाली. दरम्यान, इतर तालीम संस्था आणि मोहरम समितीच्या वतीने शहर आणि परिसरात येत्या दोन दिवसात पंजांची प्रतिष्ठापना होणार आहे. लक्ष्मीपुरी मटण मार्केट चौकातील ख्वाजा गरीब नवाज पंजा आज तब्बल सत्तर वर्षांनंतर अजमेर येथे भेटीसाठी बाहेर पडला. शाही थाटात दुपारी हा पंजा भेटीसाठी रवाना झाला. (कै) बबन लाड यांनी १९५६ साली या पंजाची प्रतिष्ठापना केली. तेंव्हापासून दीपक लाड या पंजाची सेवा करत असून अजमेर येथील भेटीनंतर सहा ऑगस्टला या पंजाचे पुन्हा शहरात आगमन होणार आहे. दरम्यान, मोहरमनिमित्त शहरात विविध पंजांच्या महात्म्याची फलक उभारले असून सहा व सात ऑगस्टला सर्वाधिक पंजे भेटीसाठी बाहेर पडणार आहेत. पारंपरिक वाद्यांसह आकर्षक विद्युतरोषणाईसह भेटीच्या भव्य मिरवणुका निघणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82751 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..