क्रीडा विद्यापीठाचा कोल्हापूरला ''खो'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा विद्यापीठाचा कोल्हापूरला ''खो''
क्रीडा विद्यापीठाचा कोल्हापूरला ''खो''

क्रीडा विद्यापीठाचा कोल्हापूरला ''खो''

sakal_logo
By

क्रीडा विद्यापीठासाठी कोल्हापूरला ''खो''
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरची घोषणा
 
सुयोग घाटगे : सकाळ वित्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर कोल्हापुरात क्रीडा विद्यापीठ होण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.  छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे क्रीडा विद्यापीठ करण्याच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंचा हिरमोड झाला आहे. प्रतिभावंत खेळाडू व जागा असूनही राजकीय अनास्थेमुळे कोल्हापूरच्या वाट्याला हे क्रीडा विद्यापीठ मिळाले नसल्याची चर्चा आहे.  क्रीडा नागरी म्हणून देशात नावलौकिक असणारे कोल्हापूर नुसते नावापुरतेच राहते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक प्रतिभावान खेळाडूंचे केंद्र असणारा हा जिल्हा शासकीय सुविधा मिळवण्यात मात्र मागे पडला आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांत विविध खेळात पारंगत असलेले खेळाडू आहेत. गेल्या काही वर्षातील राज्य, राष्ट्रीय खेळांची यादी पाहिल्यास पदकप्राप्त खेळाडूंमध्ये जिल्ह्यातील खेळाडूंचा सर्वाधिक टक्का आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेतही देशातील सर्वाधिक स्पर्धक सहभागी झालेला जिल्हाहीकोल्हापूरचं होता. हे झाले खेळाडूंच्या बाबतीत .अन्य सुविधांबाबत  जिल्ह्यात अनेक ठिकाणी क्रीडा पोषक वातावरण आहे. शहर परिसरात जागही उपलब्ध आहे. असे असूनही क्रीडा धोरण ठरवताना कोल्हापूरचा विचार सर्वात शेवटी केला जातो. यासाठी राजकीय अनास्था कारणीभूत आहे. तत्कालीन पालकमंत्र्यांनी काही प्रयत्न केल्यामुळे किमान जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ एकराची जागा उपलब्ध झाली आहे.

चौकट 
विभागीय क्रीडा संकुल
वादाच्या भोवऱ्यात
विभागीय क्रीडा संकुल निर्मितीच्या टप्प्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. २००९ ते २०२२ असा तब्बल १३ वर्षांचा काळ लोटला तरीही हे संकुल अजूनही अपूर्ण आहे. यामुळे की काय क्रीडा विकासासाठी कोल्हापुरचा विचार केला जात नाही.

कोट 
निपुण खेळाडू आणि जागा उपलब्ध असून पोषक वातावरणही आहे. असे असूनही आणखी काही भौतिक सुविधांची उपलब्धता गरजेची आहे. येत्या काही कालावधीमध्ये कोल्हापूरच्या विकासाबरोबरच या सुविधा निर्माण झाल्यास येथे क्रीडा विद्यापीठाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
-डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82755 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..