
विचारांची दिशा निश्चित करा; शरद मगर
39904
अत्याळ : शिदोरी उपक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत बोलताना शरद मगर.
विचारांची दिशा निश्चित करा
शरद मगर; अत्याळला ‘शिदोरी’त स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : शालेय जीवनातील पाचवी ते बारावीपर्यंतचा टप्पा खूप महत्वाचा आहे. या टप्प्यात आयुष्याचा पाया मजबूत होत असतो. त्यामुळे जे शिकताय ते गांभीर्याने शिका. विचारांची दिशा आताच निश्चित करा, असा सल्ला गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिला.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे शिदोरी उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाली. याप्रसंगी मगर बोलत होते. स्पर्धा परीक्षा-अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर या विषयावर बोलताना त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी शालेय अभ्यासक्रम किती महत्वाचा आहे, त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असावा याची सविस्तर मांडणी केली. महाराष्ट्र हायस्कूलच्या सन १९६४ च्या बॅचने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
मगर म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षांसाठी शालेय अभ्यासक्रमावरील बरेच प्रश्न असतात. त्यामुळे पुढे जाऊन नव्याने शिकण्याऐवजी आताच त्याची तयारी करा. पुस्तकाबाहेरील संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमच्या विचारांची बैठक तयार होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये स्पर्धा आहे. पण, यश मिळविणे अवघड नाही.’’
माजी विद्यार्थी शंकर खोराटे यांनी स्वागत केले. माजी विद्यार्थी सिताराम माने, गणपती पाटील, मसाजी खडके, पांडुरंग खोराटे, वसंत पाटील, आनंदा पाटील यांच्यासह अत्याळ, बेळगुंदी, गडहिंग्लज, करंबळी, कौलगे, हिरलगे गावातील १६७ विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट
‘बायोडाटा’ तयार करा...
मगर म्हणाले, ‘‘आपला बायोडाटा पदवीनंतर आवश्यक असतो. पण, तो शालेय जिवनातच तयार होत असतो. त्यामुळे लेखन करा, कोणत्याही विषयावर ग्रुप चर्चा करा, वाचन करा, तुमचे छंद जोपासा. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे वेगळे काही नाही, तर या साऱ्याचा परिपाक आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82797 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..