पालिका सभागृह कार्यक्रमांसाठी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका सभागृह कार्यक्रमांसाठी द्या
पालिका सभागृह कार्यक्रमांसाठी द्या

पालिका सभागृह कार्यक्रमांसाठी द्या

sakal_logo
By

पालिका सभागृह कार्यक्रमांसाठी द्या
इचलकरंजी : जुन्या नगरपालिकेतील सभागृहाची दुरुस्ती करून ते सार्वजनिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पत्रकाद्वारे शाहीर विजय जगताप यांनी केली आहे. नगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील ‘लालबहादूर शास्त्री सभागह’ विनावापर पडून असून, त्याचा वापर न झाल्यास त्याचीही दुर्दशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात सध्या छोटे समारंभ, बैठका, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने यासाठी मध्यम स्वरूपाचे सभागृह नाही, नाट्यगृहाचे भाडे परवडत नाही, इतर उपलब्ध हॉल छोटे आहेत. तेव्हा शहराच्या मध्यभागी असलेले नगरपालिकेचे हे सभागृह छोट्या कार्यक्रमासाठी उपयुक्त असून, ते आवश्यक त्या दुरुस्त्या करून वाजवी भाड्यात उपलब्ध करून दिल्यास नागरिकांची तसेच छोट्या संस्थांचीही सोय होईल आणि नगरपालिकेला उत्पन्नाचे साधनही होईल. असे पत्रकामध्ये नमूद केले आहे.
------------------------------
39909

अनिकेत सुतार रौप्यपदक
इचलकरंजी : दिल्ली येथे झालेल्या यूथ नॅशनल गेम्स स्पर्धेत शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असणाऱ्या सैनिक टाकळीचा धावपटू अनिकेत संजय सुतार याने रौप्यपदक मिळवून जिल्ह्यासह राज्याचं नावलौकिक केले. नॅशनल यूथ गेम्समध्ये अनिकेतने २०० मीटर धावणेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून सिल्व्हर कामगिरी केली आहे. अनिकेत सध्या देवचंद कॉलेज, निपाणी येथे बी कॉम भाग- २ या वर्गात शिक्षण घेत आहेत. अनिकेतचे वडील संजय सुतार हे सैनिक टाकळीमध्ये सुतार काम करीत असून, आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशा बिकट परिस्थितीत आई-वडिलांनी दिलेली साथ व गुरुवर्यांनी दिलेले प्रशिक्षण या जोरावर त्यांनी यश मिळवले आहे. अनिकेतला प्रशिक्षक रियाज मीरा खान यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------------------
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
इचलकरंजी : सूरज गॅस एजन्सीमार्फत माई बाल विद्यामंदिरात मोफत गणवेश वाटप व आयटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ झाला. माई महिला मंडळ संचालित श्रीमती बाळाबाई केशवलाल शहा माई बाल विद्यामंदिरात सूरज गॅस एजन्सीमार्फत शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले. तसेच २०२१-२२ आयटीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ झाला. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा प्रा. निर्मला ऐतवडे, उपाध्यक्षा माधुरी मर्दा, संस्थेचे सल्लागार डॉ. मर्दा, संदीप मिश्रा, सुनीता पारिख, मुख्याध्यापिका शैला कांबरे आदी उपस्थित होते.
-------------
39910

टाकळीवाडीत शाळेची स्वच्छता
इचलकरंजी : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे माजी सैनिक, तसेच गावातील नागरिकांनी श्रमदानातून शाळेची स्वच्छता केली. देशाची सेवा करून निवृत्त झालेले गावातील माजी सैनिक यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी देशसेवेबरोबर समाजसेवेचाही वसा हाती घेतला आहे. ज्या शाळेने आपल्याला घडवले त्याचे ऋण लक्षात ठेवून शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. उपक्रमात टाकळीवाडी गावातील माजी सैनिक दादा खोत, रमेश निर्मळे, केंदबा कांबळे, भागुजी निर्मळे, महादेव बदामे, बळीराम कांबळे, नंदू कांबळे, संजय  बदामे, लक्ष्मण निर्मळे, समीर अरकाटे, पांडुरंग निर्मळे, वसंत बिरणगे आदी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82811 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top