महापालिकेचा कारभार दिशादर्शक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेचा कारभार दिशादर्शक
महापालिकेचा कारभार दिशादर्शक

महापालिकेचा कारभार दिशादर्शक

sakal_logo
By

महापालिकेचा कारभार दिशादर्शक
शशांक बावचकर ः आर्थिक शिस्त गरजेची

इचलकरंजी, ता. १ ः जागा आरक्षण रद्द ठरावास स्थगिती, टॅब खरेदीला स्थगिती, अतिक्रमणमुक्त शहराच्या दृष्टीने सुरू असलेली अंमलबजावणी, नवीन आकृतिबंधाला मिळालेली मंजुरी या प्रशासकांच्या निर्णयामुळे महिन्याभरातच इचलकरंजी महापालिकेतील कारभार हा दिशादर्शक ठरला आहे. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ, आर्थिक शिस्त, काटकसरीचे धोरण याची आवश्यकता आहे, असे मत माजी नगरसेवक तथा प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांनी व्यक्त केले आहे.
पालिकेच्या अंतिम कौन्सिलमध्ये बहुमताने घेतलेले आरक्षणाच्या विषयांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तथापि, महापालिका झाल्याने प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्व ठराव ‘डेव्हलपमेंट प्लान युनिट’कडे पाठवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे महापालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आरक्षणे वगळलेल्या तत्कालीन कारभारी मंडळींचा हेतू असफल झाल्याचा दावा श्री. बावचकर यांनी केला आहे.
आरोग्य विभागाने विशिष्ट मक्तेदारांना डोळ्यासमोर ठेवून काढलेली १४ कोटींची निविदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नियुक्त केल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मात्र, अद्यापही आर्थिक शिस्त लागण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी उत्पन्नवाढीसाठी दुकानगाळ्यांचे लिलाव, कर विभागाचे कामकाज, कार्यालयातून मिळणारे उत्पन्न व खर्च या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे, असे श्री. बावचकर यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82813 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..