सकाळने माध्यमांचा जबाबदारपणा नेहमी जपला ः मनोज नगरवणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळने माध्यमांचा जबाबदारपणा नेहमी जपला ः मनोज नगरवणे
सकाळने माध्यमांचा जबाबदारपणा नेहमी जपला ः मनोज नगरवणे

सकाळने माध्यमांचा जबाबदारपणा नेहमी जपला ः मनोज नगरवणे

sakal_logo
By

39914

कोल्हापूर : माजी लष्कारप्रमुख मनोज नरवणे यांनी सोमवारी ‘सकाळ’ कार्यालयाला भेट दिली. या वेळी संपादक, संचालक श्रीराम पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शेजारी कार्यकारी संपादक निखील पंडितराव, विणा नरवणे आदी. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)


‘सकाळ’ने माध्यमांची जबाबदारी जपली

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे; वैविध्यतेतही ‘सकाळ’चे वेगळेपण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : ‘ देशात जशी वैविध्यता आहे, तशीच ती माध्यमांमध्येही आहे, ‘सकाळ''ने नेहमीच आपली जबाबदारी ओळखून पत्रकारिता केली, त्यामुळेच ‘सकाळ’कडे एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून पाहिले जाते, असे कौतुकाचे उद्‌गार माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज व्यक्त केले.
वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ‘सकाळ'' कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सर्वांशी संवाद साधला. ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार यांनी नरवणे यांना पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी नरवणे यांचा परिचय सर्वांना करून दिला.
या वेळी नरवणे म्हणाले, ‘‘देशात खूप वैविधता आहे. त्यामुळे एकच नियम सर्वत्र लागू होत नाही. मात्र हीच वैविविध्यता आपली ताकद देखील आहे. प्रसारमाध्यातही भाषा, सादरीकरणाची पद्धत यामुळे वैविध्यता दिसून येते. यातही ‘सकाळ’ने वेगळेपण जपले आहे. सुरुवातीपासूनच ‘सकाळ''ने सामाजिक बांधिलकी जपली.’’
या वेळी मनोज नरवणे यांच्या पत्नी वीणा यांनी लष्करी अधिकाऱ्याचे कौटुंबिक अनुभव सांगितले. प्रतिकूलतेतही आनंदी राहून ते आपले काम करत असतात, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी सकाळचे उप सरव्यवस्थापक रवींद्र रायकर, स्मार्ट सोबती पुरवणीच्या संपादिका सुरेखा पवार, वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, सह सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, मुख्य बातमीदार निवास चौगले उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82818 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top