इचल: आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: आंदोलन
इचल: आंदोलन

इचल: आंदोलन

sakal_logo
By

39938
‘लालबावटा’तर्फे निदर्शने
इचलकरंजी, ता. १ : मनरेगा अंतर्गत शेतमजुरांना दररोज ६०० रुपये मजुरी द्यावी, शिक्षण, आरोग्य सेवा व सार्वजनिक उपक्रमाचे खासगीकरण व व्यावसायीकरण थांबवावे. प्रति जॉबकार्डधारकास प्रत्येक वर्षाला किमान २०० दिवस काम द्यावे. ५५ वर्षांवरील स्त्री-पुरुष शेतमजुरांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन द्यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे (आयटक) प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन दिले. मागण्यांसंदर्भात योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
निवेदनात देशामध्ये लाखो शेतमजूर आहेत. मात्र, या शेतमजुरांना केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत. परिणामी सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शेतमजुरांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे सर्व भूमिहीन बेघर शेतमजुरांना घरासाठी जागा द्यावी. तसेच शौचालय व गोठ्यासाठी (जनावरांसाठी) किमान ५ लाख रुपये किंमतीचे घरकुल द्यावे. सार्वजनिक वितरण व्यवस्था व्यापक व भक्कम करून रेशन दुकानातून तांदूळ, गहू, याशिवाय, डाळी, तेल साखर, मसाले व इतर जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दरात पुरवठा करावा, आदी निवेदनात नमूद केले आहे. शिष्टमंडळात हणमंत लोहार, महेश लोहार, मीना भोरे, रमजान मुजावर, बाळासो चौगुले, मंगल तावरे आदी उपस्थित होते.
----------------
39941

काँग्रेसतर्फे वीजबिलांची होळी
महावितरण कंपनीने इंधन समायोजन आकार या नावाखाली वीज ग्राहकांवर लादलेली दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी करत वीज बिलांची होळी केली. यानंतर मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी यांना दिले. वाढ मागे न घेतल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
महावितरण कंपनीने इंधन समायोजन आकार परिपत्रक क्रमांक ३०६ प्रमाणे राज्यातील सर्वच २.८५ कोटी वीज ग्राहकांवर इंधन समायोजन आकार या नावाखाली सरासरी २० टक्के इतकी प्रचंड दरवाढ केली आहे. ही दरवाढ जुलैमध्ये आलेल्या बिलापासून पुढील पाच महिन्यांसाठी वीज ग्राहकांवर लादली आहे. ती राज्यातील कोणत्याही ग्राहकांना परवडणारी नाही. ती तातडीने मागे घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे. आंदोलनात प्रदेश सचिव शशांक बावचकर, शशिकांत देसाई, अजित मिणेकर, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, रविराज पाटील, प्रशांत लोले, समीर शिरगावे, सचिन साठे आदींनी सहभाग घेतला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82837 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..