
कोवाडच्या महावितरणला निवेदन
kwd12
चंदगड : येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे निवेदन देताना अॅड. संतोष मळवीकर व सोबत शेतकरी.
कोवाडच्या महावितरणला निवेदन
कोवाड : येथील महावितरणच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता संजय मगदूम यांची बदली करावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी अॅड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन दिले. कोवाड भागातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या चंदगड कार्यालयाला भेट देऊन मगदूम यांच्या बदलीची मागणी केली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, वाकलेले खांब व लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनींची व डिपींची वेळेवर दुरुस्ती न करणे अशा अनेक कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्याचा वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. निवेदनावर नरसिंग बाचूळकर, ए. एस. जांभळे, आण्णाप्पा राजगोळकर, परशराम बामणे, संतोबा बेळगावकर, चंद्रसेन देसाई यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82887 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..