डेंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी
डेंगी

डेंगी

sakal_logo
By

शहरात ४६ घरांत डासअळ्या
कोल्हापूर, ता. १ : महापालिकेच्या किटकनाशक विभागाकडून शहरात केलेल्या ९३१ घरांच्या तपासणीत ४६ घरे दूषित आढळली. १९८६ कंटेनरपैकी ३२ कंटेनर दूषित आढळले. २२ कंटेनरमध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकण्यात आले.
टाकाळा, फुलेवाडी, कणेरकरनगर, जवाहरनगर, तपोवन, म्हाडा कॉलनी, यादवनगर, सदरबाजार हौसिंग सोसायटी, रुईकर कॉलनी, नागाळा पार्क, केव्हीज पार्क या ठिकाणी किटकनाशक विभागाच्या पथकामार्फत सर्वेक्षण केले.
घरामध्ये भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एक वेळा कोरडी करून स्वच्छ ठेवावीत. नारळाच्या करवंट्या, वापरात नसलेले डबे, टायर यांची विल्हेवाट लावावी. झाडांच्या कुंडया, फ्रिजमागील ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नये. तापाच्या रुग्णांनी सरकारी रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावा. रक्त नमुने घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमा सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83001 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top