
आजची प्रमुख नावे
‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव
उत्स्फूर्त गर्दीत भरला स्नेहमेळावा ः रविवारपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून लेखणीच्या माध्यमातून त्यांना सतत पाठबळ देणाऱ्या ‘सकाळ’वर आज ४२ व्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव झाला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांतील घटकांबरोबर सर्वसामान्य वाचकांनी सोहळ्यास लावलेल्या उत्स्फूर्त उपस्थितीने ‘सकाळ’वर असलेल्या प्रेम आणि विश्वासाची प्रचितीच दिली. सायंकाळी साडेचारपासूनच नाट्यगृह परिसरात वाचकांची मांदियाळी अवतरली. रात्री नऊपर्यंत गर्दीच्या साक्षीनेच संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात स्नेहमेळावा झाला. दरम्यान, आज पावसाने उघडिप दिली असली तरी वाचकांकडून मात्र शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक संचालक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, ‘गोमंतक''चे संचालक जयदीप माने, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सह सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. कोरोना काळामुळे दोन वर्षे या आपुलकीच्या सोहळ्यात खंड पडला होता. त्यामुळे यंदा ‘सकाळ’ला शुभेच्छा देण्यासाठी आतुर असलेल्या वाचकांनी यंदा उदंड गर्दी केली. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे प्रमुख वक्ते असल्याने नियोजित वेळेपूर्वीच नाट्यगृहाचा परिसर गर्दीने फुलून गेला. त्यामध्ये विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय होती.
खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, के. पी. पाटील, संपतबापू पवार-पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. के. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील,डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, क्युबाचे राष्ट्रीय रेशीम सल्लागार डॉ. ए. डी. जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर, उद्योजक संजय घोडावत, व्ही. बी. पाटील, कांतिलाल चोरडिया, नितीन पाटील, अरविंदकुमार रुईया, ‘स्मॅक’चे अध्यक्ष दीपक पाटील, सुरेंद्र जैन, मॅकचे अध्यक्ष संजय पेंडसे, शिरीष सप्रे, सरोज आयर्नचे भरत आणि दीपक जाधव, मेजर जनरल विक्रांत नाईक, कर्नल विक्रम नलवडे, सौ. अश्विनी नलवडे, टी. ए. बटालियनचे स्टेशन कमांडंट श्रीगणेशा, आर्मी रिक्रूटींगचे संचालक व्ही. ए. पाल, कर्नल शिवानंद वराडकर (निवृत्त), कर्नल अमरसिंह सावंत (निवृत्त), हेमा अमीर मेहता, प्रज्ञा संजीव पाटील, संजीव पाटील, महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने, मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने, माजी संचालिका उदयानी साळुंखे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, एमआयडीसी.चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बॅंकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले, माजी अध्यक्ष रवींद्र पंदारे, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर, ‘कोजिमाशी’चे नेते दादा लाड, अध्यक्ष डी. एस. घुगरे, शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, सहकार उपनिबंधक (करवीर) बाळासाहेब पाटील, रत्नाकर बॅंकेचे माजी कार्यकारी अधिकारी सुभाष कुत्ते, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, विभागीय माहिती उपसंचालक संभाजी खराट, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, माहिती अधिकारी वृषाली पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह आणि विनोद चौगले, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष प्रदीप कापडिया, आनंद माने, प्रा. डॉ. जय सामंत, अनुराधा सामंत, महाराष्ट्र क्रीडाईचे माजी अध्यक्ष राजीव परीख, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीष खडके, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे आणि अजित मोहिते, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी महापौर आर. के. पोवार, बाजीराव चव्हाण, उदय साळोखे, सागर चव्हाण, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभिषण पाटील, माजी उपमहापौर संजय मोहिते, विक्रम जरग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा बँक संचालक भैया माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कवाळे, बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबडे, दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संचालक जयेश ओसवाल, अजित कोठारी, संपत पाटील, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, भाकपचे दिलीप पोवार, शेकापचे बाबासाहेब देवकर आदींनी शुभेच्छा दिल्या.
(उर्वरित नावे उद्याच्या अंकात)
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83037 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..