पाणी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी बंद
पाणी बंद

पाणी बंद

sakal_logo
By

शहरात आजही
कमी दाबाने पाणी पुरवढा

कोल्हापूर, ता. १ ः शिंगणापूर योजनेवरील ११०० मिमी मुख्य वितरण नलिकेवरील गळती काढण्याचे काम आज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे कसबा बावडा व कळंबा फिल्टर हाऊसवरून विविध भागात टॅंकरच्या २० फेऱ्यांद्वारे नागरिकांना पाणी देण्यात आले. मंगळवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून बुधवारी सर्व भागात सुरळीत पाणीपुरवठा होईल.
पाणी उपसा बंद करून गळती दुरूस्ती सुरू केल्याने ए, बी, व ई वॉर्ड, संलग्न उपनगरात आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पावसाने उघडिप दिली असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे अनेक भागात नागरिकांनी पाण्याचे टॅंकर मागवले. कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून विविध भागात टॅंकरच्या १३ फेऱ्या झाल्या. तसेच कळंबा फिल्टर हाऊसवरून सात फेऱ्या झाल्या. आज काही भागात कमी दाबाने पाणी आले होते. रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे पहाटेपासून पाणी उपसा सुरू झाला तर टाकी भरल्या जाणार नाहीत. त्यामुळे मंगळवारीही अनेक भागात पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83048 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..