आंबोओहळ प्रकल्प कामे बैठक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोओहळ प्रकल्प कामे बैठक बातमी
आंबोओहळ प्रकल्प कामे बैठक बातमी

आंबोओहळ प्रकल्प कामे बैठक बातमी

sakal_logo
By

‘आंबेओहळ’ग्रस्तांच्या
समस्या लवकरच सोडवू
आमदार हसन मुश्रीफ; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ ः आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित समस्याही लवकरच निकालात निघतील, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन व प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत ते बोलत होते. तांत्रिक व न्यायालयीन प्रक्रियेत प्रकल्पग्रस्तांना आवश्यक पाठबळ देऊ असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठीच्या जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू ठेवा. बेळगुंदी व बेकनाळ येथील मोजणीचे काम तातडीने करा, असे मुश्रीफ यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांनी कडगाव येथे जमिनी आणि लिंगनूर येथे रहिवासी प्लॉट मागितले आहेत. यावर प्रशासनाने असे करता येणार नाही सांगितले. त्यावर आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘शासकीय निकषानुसार शेतकऱ्यांना अनुक्रमे प्लॉट देऊन झाल्यानंतर जे शिल्लक राहतील त्याबाबत अशी मागणी करणाऱ्यांचा प्राधान्याने विचार करा. प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्यामध्ये ज्यांच्या जमिनी वीस गुंठ्यापेक्षा कमी असतील त्यांना प्रकल्पग्रस्त असे प्रमाणपत्र देता येणार नाही. ही भूमिका प्रशासनाने मांडली. वीस गुंठ्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही हायकोर्टाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.
यावेळी न्यायालयाच्या निकालाची प्रत उपलब्ध करा. त्यासाठी न्यायालयीन कामकाजासाठी लागेल तो खर्च आणि वकीलही देऊ, मुश्रीफ यांनी सांगितले.

स्वेच्छा पुनर्वसन...
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘३५५ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वेच्छा पुनर्वसन घेतले आहे. त्यांच्या सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात आहे. या प्रस्तावाचा काटेकोर पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्नही निकालात काढा.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83054 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..