कोल्हापूर लाईव्ह व्याख्यान पाहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर लाईव्ह व्याख्यान पाहिले
कोल्हापूर लाईव्ह व्याख्यान पाहिले

कोल्हापूर लाईव्ह व्याख्यान पाहिले

sakal_logo
By

जनरल नरवणे यांना ऐकले जगाने
फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह स्थानिक वाहिन्यांवरून थेट प्रसारण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे ‘भारतासमोरील सुरक्षिततेची आव्हाने आणि संधी’ या विषयावर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात व्याख्यान झाले. त्याला वाचकांनी तुडूंब गर्दी केली. मात्र त्याचवेळी हे व्याख्यान आज फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबसह बी. न्यूज, एस. न्यूज या स्थानिक वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारित करण्यात आले. त्याचा कोल्हापूर, सांगली, बेळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह जगभरातील वाचकांनी लाभ घेतला.
‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित व्याख्यानाची नेहमीच चर्चा होत असते. या व्याख्यानांना दिग्गज वक्त्यांची प्रभावळ लाभलेली आहे. यंदा माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या व्याख्यानाची पर्वणी साधण्यासाठी वाचकांनी कार्यक्रमस्थळी तुडुंब गर्दी केली. हेच व्याख्यान घरबसल्या वाचकांना ऐकता यावे यासाठी ‘सकाळ’ने विशेष व्यवस्था केली होती. ‘सकाळ फेसबुक’, इन्स्टाग्राम, युट्यूबसह बी. न्यूज, एस. न्यूज या स्थानिक वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचा लाभ वाचकांनी घरबसल्या घेतला. कार्यक्रम सुरू होताच अनेकांनी एकमेकांना या व्याख्यानांच्या लिंक शेअर केल्या.
अनेक ठिकाणी शाळांतून, स्पर्धा परीक्षा केंद्रांतून तसेच, माजी सैनिकांनी एकत्र येऊन, महिलांनी एकत्र येऊन हे लाईव्ह व्याख्यान पाहिले-ऐकले. जनरल मनोज नरवणे यांनी व्याख्याना दरम्यान मांडलेले विचार ऐकले. इचलकरंजीतील डीकेएएससी महाविद्यालयातील सर्व एनसीसी छात्रांनी एकत्र येत मार्गदर्शनातील शिदोरी जमा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83066 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..