खऱ्या धरणग्रस्तांना डावलून बैठका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खऱ्या धरणग्रस्तांना डावलून बैठका
खऱ्या धरणग्रस्तांना डावलून बैठका

खऱ्या धरणग्रस्तांना डावलून बैठका

sakal_logo
By

खऱ्या धरणग्रस्तांना डावलून बैठका
संग्राम संघटनेचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : पुनर्वसनाबाबत चर्चा करण्यासाठी खऱ्या धरणग्रस्तांना बैठकीचे निमंत्रण दिले जात नाही. अशा बैठकींना सर्व धरणग्रस्त प्रतिनिधींना निमंत्रित करण्याची जबाबदारी शासन यंत्रणेची असते. मात्र, काही कार्यकर्त्यांना घेऊन आमदार बैठका घेत आहेत. यातून दुजाभाव दिसून येत असल्याचा आरोप आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे केला आहे. याकडे लक्ष वेधणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
धरणग्रस्तांचे प्रश्न घेऊन २५ वर्षे आंदोलने सुरू आहेत. त्यातून आतापर्यंत ७० टक्के पुनर्वसन झाले आहे. उर्वरित पुनर्वसनही लवकरात लवकर झाले पाहिजे. याबाबत बैठक घेतली असल्याचे कळते. मात्र, या बैठकीला खरे धरणग्रस्त किती आणि कार्यकर्ते किती, याचा विचार व्हावा. प्रशासनाने बैठका घेताना सर्व धरणग्रस्त संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावे. यातून प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती व प्रत्यक्ष पुनर्वसन यातील तफावत लोकप्रतिनिधींसमोर येईल. यापुढे सर्वसमावेशक बैठक घेण्याची मागणी निवेदनातून केली आहे. आंबेओहळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी निवेदन दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83144 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..