
कॉमन बातम्या एकत्रितपणे
विद्यापीठ हायस्कूलमध्ये
एक लक्ष सूर्यनमस्कार संकल्प
कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूलमध्ये ७० व्या एक लक्ष सूर्यनमस्कार संकल्पाचे उद्घाटन माजी विद्यार्थी डॉ. वासीम काझी यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार अध्यक्षस्थानी होते. एस. बी. सोनार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. काझी यांनी उत्तम आरोग्यासाठी व्यायामाचे फायदे आणि सूर्यनमस्काराचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक कुंभार यांनी सूर्यनमस्कार घालणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मूठभर भिजवलेले शेंगदाणे खुराक म्हणून देण्याची पद्धत शाळेने आजही जपल्याचे सांगितले. ७ वी ते १० वीचे सर्व विद्यार्थी एकावेळी सूर्यनमस्कार घालतात, हा उपक्रम पूर्ण ऑगस्ट महिन्यात चालतो. ए. पी. साळोखे यांनी सूत्रसंचालन केले. आर. व्ही. रोकडे यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, पर्यवेक्षक एच. एम. गुळवणी, जिमखानाप्रमुख ए. जे. कोळेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
.....
40263
कोल्हापूर : शास्त्रीय गायन आणि सोलो तबलावादन स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण करताना उपस्थित मान्यवर.
शास्त्रीय संगीत स्पर्धेला प्रतिसाद
कोल्हापूर : निपाणी येथील स्वरनिनाद संगीत विद्यालय आणि विद्यार्थांतर्फे गुरू अभिवादन सोहळ्यानिमित्त व्यंकटेश मंदिरात शास्त्रीय गायन आणि सोलो तबलावादन स्पर्धा झाल्या. स्पर्धेला कर्नाटक, महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय गायन स्पर्धेत अनुक्रमे अजित कुलकणी (कोल्हापूर), श्रेया चव्हाण (गडहिंग्लज), तेजस्विनी सोनारकर (गारगोटी), उत्तेजनार्थ आरती सुगतेक (निपाणी), सोलो तबलावादन स्पर्धेत कृष्णा भोसले (मिरज), शुभम तुरंबेकर (गलगले), आयुष्य लोहार (वारणानगर). उत्तेजनार्थ प्रथमेश फल्ले (कुरुंदवाड), प्रेम भिलुगडे (मोरेवाडी), सूरज सुतार (मुगळी), प्रसाद सोनटक्के (माणकापूर) यांनी यश मिळविले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण झाले. परीक्षक म्हणून प्रिया गुरव, सुनील पोतदार, अतुल इनामदार यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कौंदाडे, रणजित कौंदाडे, लजयश्री गुदगन्नावर, निवेदिता सोलापूरकर, अण्णासाहेब पाटील, विकास पाटील, वसुधा कुलकर्णी, शैलजा कौंदाडे, रोहन मस्के यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. अमृत परीट यांनी सूत्रसंचालन केले.
...
40269 रणजित पाटील
40270 विनायक साळोखे
रणजित पाटील अध्यक्षपदी
कोल्हापूर : अवचितपीर तालीम मंडळाच्या अध्यक्षपदी रणजित पाटील, उपाध्यक्ष विनायक साळोखे-सरदार, खजानीस रोहित माने, सचिव आशुतोष जाधव यांनी निवड झाली. मंडळाची वार्षिक सभा तालमीच्या हॉलमध्ये झाली. ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल इंगवले, विकास सूर्यवंशी, विक्रम पाटील, विक्रम साळोखे, युवराज कदम, सर्व सदस्य उपस्थित होते.
...
छत्रपती राजाराम महाराज जयंती साजरी
कोल्हापूर : भवानी मंडप येथील श्री छत्रपती शाहू संगीत विद्यालयातर्फे श्री तुळजाभवानी मंदिरात श्री छत्रपती राजाराम महाराज जयंती साजरी झाली. सायंकाळी चार वाजून १० मिनिटांनी जन्मकाळ साजरा झाला. प्राचार्य अरुण जेरे, स्मिता गोसावी, राधिका पंडितराव, अपर्णा जेरे, छाया कानकेकर यांनी राजाराम महाराजांचा पाळणा सादर केला. आरती खोत, रावळ, मोहिते यांनी प्रतिमापूजन केले. कार्यक्रमासाठी हार्मोनियम साथ विजय पाटकर, तबलासाथ भारत पारकर यांनी दिली. भरत माने यांनी संयोजन केले.
...
सुलताने ट्रस्टतर्फे गणवेश वितरण
कोल्हापूर : बंडोपंत सुलताने पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे श्री विद्यामंदिरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाहूपुरी येथे गणवेश वितरण केले. विद्यार्थ्यांना ट्रस्टमार्फत प्राप्त झालेले गणवेश वितरण ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी सचिन सुलताने, पुष्पा सुलताने, भारती भूमकर यांच्या हस्ते केले. गणवेश वितरणानंतर विद्यार्थ्यांना खाऊ दिला. मुख्याध्यापक आप्पासाहेब वागरे यांनी प्रास्ताविक केले. अक्षय गुरव यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा गुरव, तृप्ती जाधव, पापा चमकले, उदय चमकले, मनीषा देसाई, वर्षा चमकले, शेफाली, सुनंदा अथने, सविता नष्टे उपस्थित होते.
...
इंग्लिश क्लबची स्थापना
कोल्हापूर : महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेत दैनंदिन जीवनात इंग्रजीचे महत्त्व जाणून सर्व शिक्षक कर्मचारी यांना इंग्रजी भाषेत संवाद साधता यावा, याकरिता संस्थेत ऑक्सफर्ड हब इंग्लिश स्पोकन क्लबची स्थापना झाली. याकरिता तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून स्नेहल कुईगडे, वर्षा पाटील, नुरजहाँ नदाफ, अर्चना आंबिलधोक यांनी काम पाहिले. त्यांनी इंग्रजीचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून विविध खेळांच्या माध्यमातून इंग्रजी कसे बोलावे, याचे प्रात्यक्षिक घेतले. संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती यांनी संस्थेतील शिक्षकांना याबाबतील लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. सचिव आशा पाटील, सहसचिव अनघा पेंढारकर, खजानीस रंजना स्वामी, बिना मोहिते, शिवानी जगदाळे, हर्षदा मेवेकरी, सर्व शाखांचे शाखाप्रमुख, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सीमा सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सहायक शिक्षिका नुरजहाँ नदाफ यांनी आभार मानले.
...
40295
शिवतेज मित्र मंडळाची कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर : शिवतेज मित्रमंडळ शाहूपुरी गणेश उत्सवची कार्यकारिणी सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाली. उत्सव समिती अध्यक्ष अमृत मांगले, उपाध्यक्ष संदीप ऊर्फ जलाराम ठक्कर, सचिव महेश पवार, खजानीसपदी सिद्धराम पाटील यांची एकमताने निवड झाली. सभेमध्ये मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम केला. २०२१ च्या जमा/खर्चास मंजुरी दिली. महापूर आणि कोरोनामुळे तीन वर्षे सार्वजनिक उत्सव साधेपणाने साजरा केला. यावर्षी उत्सव करण्याचे नियोजन केले. यावर्षीचे प्रमुख आकर्षण गरुड लेणी देखाव्याचे संकल्प चित्र प्रकाशित केले, देखाव्याचे सादरीकरण केले. २०२२ च्या खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी दिली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ सभासद अरुण जोशी, दिलीप मुधोळकर, दिलीप भोसले, प्रकाश टिक्के, जयंतीभाई सोळंकी, राजू भोगटे, तुषार भिवटे यांच्या हस्ते झाले. महेश पवार यांनी स्वागत केले. सिद्धराम पाटील यांनी आभार मानले.
...
40299
कोल्हापूर : खांडेकर प्रशालेतील निर्वाचित मंत्रिमंडळ
मतदानातून जिमखाना प्रतिनिधींची निवड
कोल्हापूर : वि. स. खांडेकर प्रशालेत विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे जिमखाना प्रतिनिधींची निवड केली. उमेदवारी अर्ज, माघार, गुप्त मतदान, मतपत्रिका, मतदान कक्ष, मतदान यादी, ओळखपत्र दाखवून मतदान अशी प्रौढ मतदानाची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अनुभवली. पाचवी ते दहावीची एकूण ३८ जिमखाना प्रतिनिधी (मुलींना ५० टक्के आरक्षणासह) निवडले. निवड झालेल्या जिमखाना प्रतिनिधीतून जनरल सेक्रेटरी मंथन इंगळे, उपजनरल सेक्रेटरी श्लोक भोसले यांची निवड केली. जिमखानाप्रमुख डी. के. रायकर, समीर जमादार, इंद्रायणी पाटील, सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. निवडणूक निरीक्षक म्हणून मधुकर भिऊंगडे, प्रमोद कुलकर्णी, भरत शास्त्री, जमादार यांनी काम पाहिले. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून मुख्याध्यापिका नेहा कानकेकर, सहायक निवडणूक आयुक्त म्हणून रायकर यांनी काम पाहिले. पर्यवेक्षक रवींद्र भोई यांचे मार्गदर्शन लाभले.
...
अथणीकर यांची निवड
कोल्हापूर : सोमवार पेठ येथील अय्याज अथणीकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीअंतर्गत परिवहन विभागाच्या सचिवपदी निवड झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष डॉ. अमित मेश्राम यांनी सहकार्य केले.
...
40304
कोल्हापूर : सत्कार स्वीकारताना रुक्मिणी माळी, विठ्ठल माळी, जयश्री गाट, अशोक माळी, मीनाक्षी माळी, साधना माळी आदी.
कर्तबगार आदर्श मातांचा
सन्मान प्रेरणादायी : गाट
कोल्हापूर : ‘‘समाजातील कर्तबगार आदर्श मातांचा सन्मान करण्याचा वीरशैव लिंगायत माळी समाजाचा उपक्रम इतरांना प्रेरणादायी आहे,’’ असे गौरवोद्गार हुपरीच्या नगराध्यक्ष जयश्री गाट यांनी काढले.
वीरशैव लिंगायत माळी समाज जिल्ह्यातर्फे आयोजित गुणी विद्यार्थी गौरव समारंभ, आदर्श माता सन्मान सोहळा झाला. रुक्मिनी माळी यांना सौ. गाट यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मानित केले. पाचवी ते बारावीतील गुणवंत मुलांचा, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा बक्षीस देऊन सत्कार झाला. समाजाने उभारलेल्या शैक्षणिक निधीतून नऊ गरजू मुलांना आर्थिक मदत केली. सुमारे ३०० वर मुलांना शैक्षणिक साहित्य प्रदान केले.
प्रारंभी समाजाचे अध्यक्ष अशोक माळी यांनी स्वागत केले शिवानंद माळी यांनी शैक्षणिक फंडासाठी ५००० रुपयांची देणगी दिली. शैक्षणिक निधीला मदत करणाऱ्यांचा सत्कार केला. इंदुताई माळी, उषा माही, प्रभाकर कुलगुडे, उत्तम माळी, राजेंद्र माळी, संदीप माळी, चंद्रकांत चिपरी, प्रकाश माळी यांचा समावेश होता. मार्गदर्शक आण्णासाहेब माळी, उद्योगपती राजेंद्र माळी, संघटनेचे उपाध्यक्ष संतोष माळी, महिला संघटेच्या अध्यक्षा मीनाक्षी माळी, उपाध्यक्षा साधना माळी, प्राचार्य जी. पी. माळी, संचालक राजू माळी, अनिल माळी, काशिनाथ माळी, राजू यादव, संभाजी माळी, शशिकांत माळी, बाबासाहेब चपाले, तानाजी माळी, किशोर माळी आदी उपस्थित होते. बाळासाहेब माळी यांनी आभार मानले.
...
अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे इशारा
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका मदतनीस महागाईने त्रस्त असून, त्यांना वेतन न दिल्यास ऑगस्टनंतर रास्ता रोको, जेल भरो अशी आक्रमक आंदोलने करावी लागतील, असे महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघाने पत्रकाद्वारे जाहीर केले.
महाराष्ट्रभरात विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जी आंदोलने केली, त्याचे परिणामी महिला बाल विकास खात्याच्या तत्कालीन मंत्री यशोमती ठाकूर यांनी मानधन वाढीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले, परंतु सरकार पडल्यामुळे तो प्रश्न तसाच राहिला. महाराष्ट्रातील अंगणवाडी संघटनांच्या कृती समितीने संबंधित मंत्र्यांना तयार करण्यास सांगितलेला प्रस्ताव नवीन सरकारच्या मंत्र्यासमोर अधिकाऱ्यांनी मांडावा, अशी सूचना करण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी कर्मचारी मानधनी नसून वेतनी कामगार आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे वेतनाचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. अशा स्थितीत नवीन सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वेतन लागू करण्याचा लवकर निर्णय करावा. तसे न झाल्यास सरकारमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी आंदोलनाचा निर्णय संघटनांना करावा लागेल, असे चित्र आहे. लवकर याबाबत अंगणवाडी संघटनांच्या कृती समितीत प्रस्ताव ठेवणार आहे, असे महासंघाने जाहीर केले. याबाबतची माहिती अध्यक्ष अतुल दिघे यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
डॉ. व्ही. टी. पाटील यांना अभिवादन
कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठ आणि मौनी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांची १२२ वी जयंती कमला कॉलेजमध्ये झाली. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांचे हस्ते काकाजींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. तसेच काकाजी यांचे जीवन चरित्र या भित्तीपत्रकाचे उद्घाटन झाले. या भित्तीपत्रकात काकाजी यांचे शिक्षण, सहकार, राजकारण, उद्योग व्यवसाय क्षेत्रांतील योगदानाचा आढावा घेणाऱ्या विविध लेखांचा समावेश होता. कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्रा. डॉ. अनिल घस्ते, प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ. नीता धुमाळ, प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, प्रा. रेखा पंडित, प्रा. वर्षा साठे, ग्रंथपाल ऊर्मिला कदम, उपप्राचार्य प्रा. एम. एन. जाधव, कार्यालयातील अधीक्षक संजय शिंदे, प्रा. एच. व्ही. पुजारी, प्रा. रूपाली शिंदे, प्रा. माधवी माळी, प्रा. डी. ए. पाटील यांचे सहकार्य लाभले.
...
40322
शाम कांबळे यांची निवड
कोल्हापूर : नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या कामगार संघ जिल्हा युवक अध्यक्षपदी शाम कांबळे यांची निवड झाली. राष्ट्रीय अध्यक्ष आनंद कांबळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी निवडीचे पत्र दिले.
……………………………………………………………….
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83183 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..