‘ओंकार’मध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओंकार’मध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
‘ओंकार’मध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा

‘ओंकार’मध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा

sakal_logo
By

40273
‘ओंकार’मध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी. ए. भाग तीनच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थी विकास कक्षातर्फे हा कार्यक्रम झाला. पोलिस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वत:ला ओळखायला शिका, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. विद्यार्थी विकास कक्षाचे समन्वयक डॉ. डी. जी. चिघळीकर यांनी स्वागत केले. हॅन्सन कुटिनो, अजित पाटील, प्रतिभा दुंडगे, सर्फराज खतीब, युवराज पाटील, जयश्री देसाई यांची भाषणे झाली. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष मोहन मोरे, माजी विद्यार्थी असोसिएशनचे सचिव जयश्री देसाई उपस्थित होते. डॉ. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले.
-----------------------------
‘शिवराज’मध्ये ८ पासून व्याख्यानमाला
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ८ ते १४ ऑगस्ट दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. या व्याख्यानांमधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विविध पैलूंवर उहापोह होणार आहे. सात दिवस सकाळी नऊ ते दहा या वेळेत ही व्याख्यानमाला होईल. यात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे योगदान या विषयावर अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, भारतीय स्वातंत्र्य व साम्यवादावर डॉ. राजेंद्र गुंडे, स्वातंत्र्य चळवळीविषयी प्रा. सुधीर मुंज, स्वातंत्र्य चळवळीतीत साहित्यकांचे योगदान याविषयी डॉ. मनमोहन राजे, स्वातंत्र्य व आझाद हिंद सेना विषयावर प्रा. गौरव पाटील, स्वातंत्र्य व प्रतिसरकार याविषयी कॉ. दशरथ दळवी आणि भारतीय स्वातंत्र्य विषयावर प्रा. किसनराव कुराडे मार्गदर्शन करणार आहेत. या व्याख्यानांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
-----------------------------------------------

टिळक, साठेंना अभिवादन
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली. श्‍वेता मगदूम यांनी प्रास्ताविक केले. सोनल गिलबिले, धनश्री इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. बी. डी. पाटील यांनी टिळक व साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला. समीक्षा पालकर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहा कांबळे यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. एस. एम. रायकर आदी उपस्थित होते.
--------------------------------------------
टिळक पुण्यतिथी, साठेंची जयंती
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागातर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी केली. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. काशिनाथ तनंगे यांनी स्वागत केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शर्मिला घाटगे यांनी आभार मानले.
-----------------------------------------
क्रिएटिव्हमध्ये टिळक, साठेंना अभिवादन
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व ज्यु. कॉलेज ऑफ सायन्समध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी झाली. संस्थाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई अध्यक्षस्थानी होते. सचिव आण्णासाहेब बेळगुद्री व मुख्याध्यापक दिनकर रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. देसाई यांनी साठे व टिळक यांच्या कार्याचा आढावा घेतला. मुख्याध्यापक श्री. रायकर यांनी स्वागत केले. सौ. प्रियंका गवळी यांनी आभार मानले. जे. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83210 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..