हेब्बाळला पेयजलच्या जलशुद्धीकरणचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेब्बाळला पेयजलच्या जलशुद्धीकरणचे उद्‍घाटन
हेब्बाळला पेयजलच्या जलशुद्धीकरणचे उद्‍घाटन

हेब्बाळला पेयजलच्या जलशुद्धीकरणचे उद्‍घाटन

sakal_logo
By

40277
-------------------------------------------------
हेब्बाळला पेयजलच्या
जलशुद्धीकरणचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे पेयजल योजनेचे व जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्‍घाटन केदारी रेडेकर संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांच्याहस्ते झाले. सरपंच प्रमोदिनी कांबळे व उपसरपंच सूरज गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेडेकर म्हणाले, ‘‘पेयजल योजनेमुळे गावात स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. नदीतून येणारे अशुद्ध पाणी आता शुद्धीकरण होऊन गावकऱ्‍यांना मिळणार असल्याने आरोग्याचा प्रश्‍नही निकाली निघणार आहे. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच रेडेकर धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य विषयक सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’
आर. बी. पाटील यांनी स्वागत केले. श्री. रेडेकर यांचा सत्कार केला. पोलिसपाटील शिवाजी गवळी, राजेंद्र गवळी, राजेंद्र चौगुले, चंद्रशेखर मठदेवरु, लक्ष्मण सोलापुरे, आप्पासाहेब पाटील, गजानन पाटील, मलाप्पा शिरगावे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83214 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top