रोटरी-रॉयल्सचा पदग्रहण समारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी-रॉयल्सचा पदग्रहण समारंभ
रोटरी-रॉयल्सचा पदग्रहण समारंभ

रोटरी-रॉयल्सचा पदग्रहण समारंभ

sakal_logo
By

40319

‘रोटरी-रॉयल्स’चा
पदग्रहण समारंभ

कोल्हापूर ः रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सचा पदग्रहण समारंभ हॉटेल रेडीयंट येथे झाला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी ‘रोटरी’चा हॅमर व गॅव्हल नूतन अध्यक्षा सविता पाटील यांना प्रदान केले. असिस्टंट गव्हर्नर सुजाता लोहिया यांनी प्रेसिडेंट, सेक्रेटरी अँजेला नोरेन्ज व ट्रेझरर मनीषा राठोड यांना पिन प्रदान केली. नूतन अध्यक्षा सविता पाटील यांनी स्वयंसिद्धा प्रकल्पाद्वारे गरीब, गरजू, निराधार स्त्रियांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. श्री. बोरसादवाला यांनी ११४ वर्षांनंतर रोटरी इंटरनॅशनलच्या या वर्षीच्या प्रेसिडेट जेनिफर जोन्स एक महिला असल्याने हे वर्ष महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
सुजाता लोहिया यांनी कोल्हापूर रॉयल्स या क्लबच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. माजी अध्यक्षा प्रिया बासरानी यांनी क्लबने ५५ प्रकल्प केल्यामुळे या वर्षीचा बेस्ट एक्सलन्स ॲवॉर्ड व अनेक प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगितले. जीएसआर वारणा वडगावकर, डॉ. रेश्मा पवार, डॉ. रूपाली शिंदे, डॉ. मीना खंडेलवाल, डॉ. संगीता निंबाळकर, देणगीदार मनोज गुणे यांचा सत्कार झाला. दीप्ती खामकर, डॉ. विद्या साळोखे, स्मिता सावंत- मांडरे, विद्या साळुंखे, जास्मीन जमादार, ज्योती जाधव, जया शिंदे, प्रेमा चौगुले, सारिका बकरे, गौरव काईंगडे आदी उपस्थित होते. अँजेला नोरेन्ज यांनी आभार मानले. सुषमा धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83244 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..