
लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती
(कालच्या टुडे ६ वरून लीड घेणे)
आण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळकांच्या कार्याचा जागर
करवीर नगर वाचन मंदिर
करवीर नगर वाचन मंदिरात अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, कोषाध्यक्ष उदय सांगवडेकर यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सहकार्यवाह अश्विनी वळीवडेकर, श्याम कारंजकर उपस्थित होते.
--
कोरगावकर हायस्कूल
येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक संजय सौंदलगे, मानसिंग हातकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. दहावी ‘क’ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. राजू संकपाळ यांनी लोकमान्य टिळक आणि आण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला. सावित्री श्रीधर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालनाट्याचे सादरीकरण केले. वृषाली कुलकर्णी, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. पी. मोरे यांनी केले. प्रमिला साजणे यांनी आभार मानले.
--
इंदुमतीदेवी हायस्कूल
महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्थेच्या प्रिन्सेस इंदुमतीदेवी हायस्कूल फॉर गर्ल्स हायस्कूलमध्ये चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा झाल्या. आशा खवाटे, सुनिता लोखंडे, सरिता सुतार, उर्मिला जाधव यांनी परीक्षण केले. अल्फिया अत्तार, आर्या ढोबळे, श्रृती गुळवणी, भूमी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका शैलजा भोसले यांनी कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. पर्यवेक्षिका वर्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन तुलसी ओसवाल, त्रिशला लोकरे यांनी केले. करूणा मोरे यांनी आभार मानले.
--
लोकराज्य जनता पार्टी
राजारामपुरी येथील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अनिल चव्हाण, संतोष बिसुरे, विजय केसरकर, शहर संघटक शशिकांत जाधव, सरचिटणीस अमोल कांबळे, अशोक तोरसे, देवेंद्र पटेकरी, सर्जेराव भोसले, अनिल वरेकर, प्रशांत निकम आदी उपस्थित होते.
--
सुनितादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल
मार्केट यार्ड येथील सौ. सुनितादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये वैभव बागल, आयुष पाटील, आदिती देवकुळे, किर्ती कुंभार, अंजली बेनाडीकर, आयुष पाटील, प्रथमेश पडवळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. मुख्याध्यापक धनाजी बेलेकर, मनिषा शिरगावे, दत्तात्रय कोळेकर, नितीन विभुते उपस्थित होते.
--
जय भारत हायस्कूल
जय भारत शिक्षण संस्था संचलित जय भारत हायस्कूल व डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमेचे पूजन झाले. शिक्षक व्ही. एन. कांबळे यांनी इंग्रजी भाषेतून लोकमान्य टिळकांची माहिती सांगितली. हायस्कूलचे लिपीक बाजीराव माणगावे यांनी आण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमित्रा यांनी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, अरूण कुंभार, शितल काळे उपस्थित होते.
--
नुतन मराठी विद्यालय हायस्कूल
प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक डी. ए. शिंदे, जिमखाना प्रमुख आर. एन. कुंभार, समारंभ प्रमुख ए. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक ए. डी. पाटील यांनी केले. श्रावणी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पी. पी. कुलकर्णी यांनी केले. आभार व्ही. आर. शिंदे यांनी मानले.
--
दत्ताबाळ हायस्कूल
संस्थेच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका पल्लवी देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. सविता पाटील यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी वक्तृत्व स्पर्धा झाली. माजी नगरसेवक निलेश देसाई, विश्वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, किर्ती मिठारी, प्रणिता वर्धमाने उपस्थित होते.
--
भारतरत्न ज्येष्ठ नागरिक संघ
वसंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. प्रास्ताविक व स्वागत वसंतराव खांडेकर यांनी केले. विमल पोखर्णीकर, युवराज राजवाडे व प्रमोद हुपरीकर यांनी आण्णा भाऊ यांच्या कार्याचा आढावा घेतला. लहु पाटोळे यांनी आभार मानले. यावेळी गुंडु कांबळे, सर्जेराव मालेकर, दादासो कांबळे, शिवाजी चोपडे उपस्थित होते.
--
खादी व ग्रामोद्योग संघ
कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक व वारस संघटना, लोकसेवक लोकमित्र यांच्यातर्फे अभिवादन करण्यात आले. प्राचार्य व्ही. डी. माने अध्यक्षस्थानी होते. खादी संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई, प्रा. सुजय देसाई, प्रा. डी. डी. चौगले, प्रकाशराव चौगुले यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. लोकमान्य टिळक यांचे जीवनकार्यही उलगडले. यावेळी गीता गुरव, सविता देसाई, शांता पाटील, छाया भोसले, अरूणा मांगुरे, छाया रेंदाळकर उपस्थित होते.
--
मिलिंद हायस्कूल
मुख्याध्यापक एम. एम. शिर्के यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. एस. डी. पुजारी यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.
-
40328
कोल्हापूर : निर्मिती विचारमंच आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे’ पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित मान्यवर.
‘विद्रोही साहित्याचे जनक
अण्णाभाऊ साठे’चे प्रकाशन
कोल्हापूर, ता. २ : निर्मिती विचारमंच आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. गुरव, प्रमिला गुरव यांचा प्रा. टी. के. सरगर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन सत्कार केला. निर्मिती प्रकाशन प्रकाशित प्रा. डॉ. बाबुराव गुरव लिखित ’विद्रोही साहित्याचे जनक अण्णाभाऊ साठे’ पुस्तकाचे प्रकाशन कवी डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या हस्ते झाले. लेखक विश्वास सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्रोही कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून डॉ. अमर कांबळे, संघसेन जगतकर, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. शोभा चाळके, प्रताप घेवडे, चंद्रकांत सावंत, पी. के., रघुनाथ कापसे, स्वप्निल गोरंबेकर आदींनी कविता सादर केल्या. अॅड. करुणा विमल, विमल पोखर्णीकर, सनी यळावकर, भरत गुरव, मिहीर कुलकर्णी, सदाशिव कांबळे, शिवाजी चौगुले, संजय सासणे, भगवान माने, महादेव चक्के, सुनील कांबळे, बाळासाहेब भोसले उपस्थित होते. सुरेश केसरकर यांनी स्वागत केले. अनिल म्हमाने यांनी सूत्रसंचालन केले. राहुल काळे यांनी आभार मानले.
-
01016
कसबा सांगाव ः येथे सांस्कृतिक भवनाचा पाया खुदाईप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ. शेजारी युवराज पाटील, भैय्या माने, सरपंच रणजित कांबळे, संजय हेगडे आदी.
सांस्कृतिक भवनाचा पायाखुदाई समारंभ
कसबा सांगाव, ता.२ ः वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक मुंबईत असले तरीही मराठी माणूस हीच मुंबईची खरी ताकद आहे. याला मुंबईपासून कोणीही वेगळे करू शकत नाही. आण्णा भाऊंच्या प्रेरणेतून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली असे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
येथे हसन मुश्रीफ युवा शक्ती आयोजित सांस्कृतिक भवनाचा पायाखुदाई समारंभप्रसंगी ते बोलत होते. माजी जि.प.सदस्य युवराज पाटील, भैय्या माने प्रमुख उपस्थित होते. प्रा. डॉ. संभाजी बिरांजे यांचे व्याख्यान झाले. सरपंच रणजित कांबळे, राजेंद्र माने, किरण पास्ते, अमोल माळी, उपसरपंच विक्रमसिंह जाधव, सुरेश लोखंडे, डी. एन.हेगडे उपस्थित होते. युवा शक्तीचे अध्यक्ष संजय हेगडे यांनी स्वागत केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83254 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..