आजऱ्यात लोकमान्य टिळक, लोकशाहीर साठेंना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजऱ्यात लोकमान्य टिळक, लोकशाहीर साठेंना अभिवादन
आजऱ्यात लोकमान्य टिळक, लोकशाहीर साठेंना अभिवादन

आजऱ्यात लोकमान्य टिळक, लोकशाहीर साठेंना अभिवादन

sakal_logo
By

आजऱ्यात लोकमान्य टिळक, लोकशाहीर साठेंना अभिवादन
आजरा, ता. 2 ः आजरा तालुक्यात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, विविध संस्थांमध्ये अभिवादन केले. व्यंकटराव हायस्कूलमध्ये प्राचार्य एस. जी. खोराटे व पर्यवेक्षक एस. एन. पाटील यांच्याहस्ते प्रतिमांचे पुजन झाले. वेशभुषा व पोस्टर प्रदर्शन झाले. विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. संचिता नाईक, नियती प्रधान, प्रेरणा नावलकर यांनी सुत्रसंचालन केले. गार्गी जाधव हिने आभार मानले. साळगाव (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेत मैथली माडभगत व सानिया कांबळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. मुख्याध्यापिका मंजीरी यमगेकर अध्यक्षस्थानी होत्या. गीता जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय मोहीते व श्री. यमगेकर यांनी टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याची माहीती दिली. विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा झाल्या. विजेत्यांना बक्षिसांचे वाटप केले. सत्यवान सोन्ने यांनी सुत्रसंचालन केले. निवृत्ती मिटके यांनी आभार मानले. येथील आजरा हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एस. जी. येसणे, उपमुख्याध्यापक श्री. दरी, पर्यवेक्षक श्री. होलम यांच्याहस्ते प्रतिमा पुजन झाले. लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा सौ. शेलार व अण्णा भाऊ साठेंच्या कार्याचा आढावा संतोष कालेकर यांनी घेतला. विद्या हरेर यांनी सुत्रसंचालन केले. आर. एच. मुल्ला यांनी आभार मानले.
----------
आजरा महाविद्यालयात कार्यक्रम
येथील आजरा महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास कक्षातर्फे कार्यक्रम झाला. प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे योगदान याविषयावर मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विकासात मराठी माणसाचे मोठे योगदान राहीले आहे.’ उपप्राचार्य प्रा. दिलीप सकपाळ, कार्यालय अधिक्षक योगेश पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83314 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..