नागपंचमी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपंचमी उत्साहात
नागपंचमी उत्साहात

नागपंचमी उत्साहात

sakal_logo
By

40330
40326

सापांबाबत प्रबोधन, धार्मिकतेचा जागर
शहर परिसरात पारंपारिक उत्साहात नागपंचमी साजरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः नागपंचमीनिमित्त शहरातील नागोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली. श्रावणातील पहिला सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपंचमीनिमित्त धार्मिक विधी झाले. सर्पमित्र संस्थांतर्फे नागरिकांना सर्पांविषयी माहिती दिली. धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून शहरात नागपंचमी साजरी केली. नागपंचमीनिमित्त घरोघरी नागाच्या मूर्तीची पूजा केली. दूध, लाह्या, ओल्या नारळाच्या करंजा यांचा नैवेद्य दाखवला.
शुक्रवार पेठेतील कद्रे आणि नागराज गल्लीतील नागोबा मंदिराचे लोकवर्गणीतून सुशोभीकरण केले आहे. मंदिर भाविकांना आजपासून दर्शनासाठी खुले झाले. यानिमित्ताने महाप्रसादाचे वाटपही झाले.
पंचेचाळीस वर्षांपूर्वी कद्रे गल्लीतील घराजवळ नागोबाची दगडी मूर्ती होती. त्यानंतर नागरिकांनी छोटे मंदिर उभारले. नागराज गल्लीत नाभिक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने असल्याने त्यांची नागोबावर श्रद्धा आहे. त्यानंतर आजअखेर तीन ते चार वेळा मंदिराचे सुशोभीकरण आले आहे. पण मंदिरावर शिखर नसल्याने यावर्षी परिसरातील नागरिकांनी शिखरासह मंदिराचे सुशोभीकरण केले आहे. लोकवर्गणीतून देखणे मंदिर साकारलेआहे. मंडळाचे मदन माने, अमर माने, श्रीकांत भोसले, उदय माने, संजय माने, राजेश रणवरे, उत्तम माने, अमृत माने, विनायक माने, गणेश पोवार यांनी सुशोभीकरण उपक्रमाचे नियोजन केले.

बावड्यातही नागपंचमीचा उत्साह
कसबा बावडा येथील तुकाबाई मंदिर परिसरात असलेल्या शेषनाग मंदिरात आज नागपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर दिवसभर नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. सायंकाळनंतर तर गर्दीचा महापूर या परिसरात पाहायला मिळाला. या परिसरात खेळणी, खाऊचे स्टॉल उभारले होते. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती.

नागाळा पार्कात जत्रा
नागाळा पार्क येथील नागोबा मंदिर परिसरात जत्रा भरली. लहान मुलांच्या खेळण्यांच्या स्टॉलनी परिसर गजबजून गेला. नागाळा मंदिर परिसरातील झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांसोबत लहान मुलांनी आनंद लुटला. अंबाबाई मंदिरातील कारंजा चौकात असलेल्या नागोबा प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. शिवाजी पेठ येथील महाकाली मंदिरात नागपंचमी साजरा झाली. नागदेववाडी येथेही नागोबा मंदिरात वि​विध धार्मिक कार्यक्रम केले.

माहितीतून प्रबोधन
पर्यावरणप्रेमी सर्पमित्र अनिल चौगले यांनी वि.मं. हणमंतवाडी शाळेत ‘विषारी व बिनविषारी साप’ तसेच सापांविषयी संपूर्ण माहिती श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयीची सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पाटील सर्व सदस्य व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83321 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top