जिल्हा बॅंकेचे वाढीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेचे वाढीव
जिल्हा बॅंकेचे वाढीव

जिल्हा बॅंकेचे वाढीव

sakal_logo
By

जिल्हा बॅंक लोगो


वाढीव संचालक पुढच्या निवडणुकीनंतर
सभेचा ठराव शासनाला देणार; उपविधीला मंजुरीनंतरच होणार कार्यवाही
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ २१ वरून २५ होत आहे. यासंदर्भात जिल्हा बॅंकेच्या १६ सप्टेंबरला होणाऱ्या वार्षिक सभेत ठराव केला जाईल. उपविधी दुरुस्तीसाठी ठराव शासनाकडे पाठवला जाईल. जर शासनाने वाढीव संचालकांना मान्यता दिली तरच ज्यावेळी बॅंकेची निवडणूक होईल, त्यानंतर जिल्हा बॅंकेत २१ ऐवजी २५ संचालक जिल्हा बॅंकेत कार्यरत होतील.
जिल्हा बॅंकेत उलाढाल वाढली आहे. दहा वर्षात बॅंकेच्या सभासद संस्थाही वाढल्या आहेत. २०१६ पासून २०२०-२०२१ पर्यंत ११ हजार ४७७ वरून ११ हजार ६३० हून अधिक संस्था सभासद झाल्या आहेत. बॅंकेच्या एकूणच कामकाजाचा विचार करता बॅंकेत दूध आणि महिला महिला गटातून १ आणि संस्था गटातून ३ संचालक वाढीची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, संचालक वाढीची मागणी करत असताना याबद्दल सर्वसाधारण सभेत ठराव करावा लागतो. ठराव मंजूर झाल्यानंतर तो शासनाकडे मंजूरीस पाठवला जाईल. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बॅंकेचा उपविधी बदलावा लागेल. उपविधी बदलल्यानंतर ज्यावेळी बॅंकेची नव्याने निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी बॅंकेचे जे निवडणूक निर्णय अधिकारी नव्या आणि बदललेल्या उपविधीप्रमाणे निवडणूक जाहीर करतील. या निवडणूकी विजयी होणारेच वाढीव संचालक बॅंकेत काम करतील. त्यामुळे सध्या ते स्वीकृत होणार की निवडून येणार याबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे.

मंजुरीचा प्रश्‍न
नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जागा वाटपावरून गोंधळ झाला. भविष्यात असा गोंधळ थोपवण्यासाठी जागा वाढीचा पर्याय चांगला आहे. या पर्यायाने जिल्हा बॅंके सत्ताधाऱ्यांना गट अधिक मजबूत करण्याची चांगली संधी मिळू शकते. मात्र, सत्ताधाऱ्यांना बळ देण्यासाठी सध्याचे सरकार याला मंजूरी देईल का? हाही मोठा प्रश्‍न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83384 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..