टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

शहरात पंजे प्रतिष्ठापना
दोन वर्षांनी रंगणार पंजे भेटीचे सोहळे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२: हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमला आता प्रारंभ झाला असून बहुतांश ठिकाणी पंजे प्रतिष्ठापना झाली आहे. दरम्यान, या निमित्ताने उद आणि धुपाचा सुगंध साऱ्या शहरात दरवळू लागला आहे. एकूण दहा दिवस मोहरमचा सण साजरा होणार असून ६ आणि ७ ऑगस्टला शहरात पंजे भेटीचे सोहळे सजणार आहेत. या निमित्ताने भव्य मिरवणूक निघणार असून दोन वर्षांनी हा उत्साह अनुभवायला मिळणार आहे. शहर आणि परिसरात अडीचशेहून अधिक ठिकाणी पंजांची प्रतिष्ठापना झाली आहे. शाहूकालीन परंपरा असलेला हेमंत पंडत यांचा चांदसाहेब पंजा गुरुवारी ( ता.४) चांद शिरदवाड येथे भेटीसाठी बाहेर पडणार आहे. शुक्रवारी (ता.५) या पंजाचे कोल्हापुरात आगमन होणार आहे.

चौकच
आठ रोजी खत्तलरात्र
दरम्यान, ८ ऑगस्टला सर्वत्र खत्तल रात्रीचा पारंपारिक विधी होणार असून ९ ऑगस्टला मोहरम दिवशी पंजे विसर्जन होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83418 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..