
जिव्हाजी जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ
जिव्हाजी जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ
इचलकरंजी, ता. ३ ः येथील स्वकुळ साळी समाजातर्फे यंदाही भगवान जिव्हाजी जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. १० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या कालावधीत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष दिलीप ढोकळे व जन्मोत्सव सोहळा कमिटीची अध्यक्ष श्री. दुधाणे यांनी दिली.
दररोज सायंकाळी सात ते आठ या वेळेत भगवान जिव्हाजी ग्रंथ वाचन होणार आहे. याशिवाय चित्रकला, मेहंदी, पाककला, रांगोळी, झिम्मा-फुगडी या स्पर्धांसह आरोग्य शिबिर, व्याख्यान, विनोदी कार्यक्रम, सोंगी भजन, भजन असे कार्यक्रम होणार आहेत. १० ऑगस्टला सकाळी सव्वा सहा वाजता जन्मोत्सव सोहळा व महाप्रसाद वाटप होईल. तसेच पालखी मिरवणूक, रथ मिरवणूक, हळदी-कुंकू कार्यक्रम, बक्षीस वितरण होणार आहे. कार्यक्रम भगवान जिव्हाजी सांस्कृतिक भवन येथे होतील. २१ ऑगस्टला घोरपडे नाट्यगृहात भगवान जिव्हाजी पुरस्कार वितरण सोहळा व विविध गुणदर्शन कार्यक्रम होईल. यावेळी ज्येष्ठ समाज बांधवांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83443 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..