
खूनाचा छडा
४०५१४
वृद्धेचा खून, चोरीचा छडा
चिंचवाडमधील लूट प्रकरण; शिरोळचा संशयित जेरबंद ; ‘टोपी’वरून यशस्वी तपास
सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. ३ ः चिंचवाड (ता. शिरोळ) येथील वृद्धेचा खून करून जबरी चोरी केलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात छडा लावला. याप्रकरणी प्रकाश लक्ष्मण नंदीवाले (वय ३३, नंदीवाले वसाहत, शिरोळ) या संशयिताला जेरबंद केले. अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, चिंचवाड (शिरोळ) येथील काकडे मळा शेतातील घरात चंपाबाई ककडे व भूपाल ककडे हे वृद्ध दांपत्य राहत होते. अज्ञाताने ३० जुलैला त्यांच्या घरात प्रवेश करून भूपाल ककडे यांना जोरात ढकलून दिले. त्याने चंपाबाई ककडे यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील फुले जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणाची नोंद शिरोळ पोलिस ठाण्यात झाली. सदरचा गुन्हा संवेदनशिल असल्याने घटनास्थळी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट दिली. त्यांनी स्वतंत्र पथके तैनात करून त्यांना तपासाच्या सूचना दिल्या.
पाणी मागण्याचा बहाणा
घटना घडलेले ठिकाण शिरोळपासून निर्जन शेतवस्तीत होते. त्यामुळे माहिती उपलब्ध होत नव्हती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकाने टोपी घातली होती आणि तो मोटारसायकलवरून दिसून आला. हाच धागा पकडून तपास सुरू केला. शिरोळ, जयसिंगपूर येथे तपास करताना संबधित सूतगिरण ते शिरोळ रस्त्यावरून जात होता. त्याला मंदिराजवळ पथकाने ताब्यात घेतले. संशयिताने त्याचे नाव प्रकाश नंदीवाले असल्याचे सांगितले. गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली. यामध्ये तो याच परिसरात राहतो. त्याला ककडे दांपत्य एकटेच राहत असल्याची माहिती होती. त्याने दोन दिवस पाळत ठेवली. तो ३० जुलैला रात्री त्यांच्या घरात पाणी मागण्याचा बहाणा करून गेला. चंपाबाई ककडे यांनी त्याला पाणी पिण्यास दिले. त्यानंतर त्याने खुनाचे कृत्य केले. जबरदस्तीने दागिने काढून घेऊन तो मोटारसायकलने निघून गेल्याची माहिती पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपास पथकाला बक्षीस
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड करणाऱ्या तपास पथकाला अधीक्षक बलकवडे यांनी १० हजाराचे बक्षीस जाहीर केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83530 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..