आयसोलेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयसोलेशन
आयसोलेशन

आयसोलेशन

sakal_logo
By

40602


‘आयसोलशन’ सुरू; पण नावालाच
रुग्णालयात ३४ पैकी १७ पदे रिक्त; कर्मचाऱ्यांवर ताण, आवश्यक मनुष्यबळाची गरज
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः तीन डॉक्टर आणि तीन नर्स, कुणीही रजेवर जाण्याची सोय नाही, अचानक गेलाच तर तीनही शिफ्ट एकाच डॉक्टर किंवा परिचारिकेने करायच्या, त्यांना सुटी देण्यासाठी दुसऱ्यादिवशीही अशाच शिफ्ट, त्यातूनच बाह्यरुग्ण विभागही पाहायचा, परिचारिका नसल्यास ड्यूटीवरील डॉक्टरनेच सारे करायचे, ड्रेसर, लिपिक अशी अनेक पदे मंजूर पण केवळ कागदावरच. महापालिकेचा खात्रीचा दवाखाना अशी ओळख असलेल्या आयसोलशन रुग्णालयाची सध्या ही अवस्था आहे. महापालिका प्रशासनाकडून आवश्‍यक कर्मचाऱ्यांची व्यवस्था होत नसल्याने रुग्णालय सुरू आहे पण केवळ नावालाच झाले आहे. येथील ३४ पैकी १७ पदे रिक्त आहेत. सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर सेवेचा ताण असून येथे आकृतीबंदानुसार पदे भरण्याची गरज आहे.
नेहरूनगर परिसरात महापालिकेने हे रुग्णालय सुरू केले आहे. विविध रोगांवरील उपचारांसाठी रात्रंदिवस डॉक्टर-कर्मचारी उपस्थित असायचे.
त्यामुळे येथे विविध भागातून रुग्ण यायचे. हा लौकिक रुग्णालयाचा लौकिक मात्र अलीकडे ढेपाळला आहे.
कोरोना काळात येथे इतर उपचार बंद करून केवळ कोरोना रुग्णांवरील उपचार सुरू केले. त्यावेळी येथे असलेले कर्मचारी सावित्रीबाई रुग्णालयाकडे वळवले. कोविडचे रुग्ण कमी झाल्यानंतर २८ जुलै रोजी पूर्ववत इतर साथीच्या रुग्णांसाठी उपचार सुरू केले. पण तीन शिफ्टसाठी आवश्‍यक असलेले पुरेशे कर्मचारीच दिले नाहीत.
एक वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबर तीन डॉक्टर आहेत. एक इनचार्ज व तीन परिचारिका आहेत. वैद्यकीय अधिकारी व परिचारिका इनचार्ज कार्यालयीन कामही करतात.
तीन शिफ्टसाठी तीनच डॉक्टर व तितक्याच परिचारिका आहेत. यामुळे रजा सुटी कुणालाही घेता येत नाही. तब्येतीमुळे आजारी पडल्यास यापेक्षाही भयानक स्थिती येते. सध्या अन्य साथीच्या रुग्णांसाठी रूग्णालय सुरू केले आहे. त्यानुसार तीन रुग्ण दाखल आहेत. पण सेवा देताना डॉक्टर व परिचारिकांची दमछाक होत आहे.

आयसीयू बेड, व्हेंटिलेटरचाही वापर नाही
कोरोना काळात चार बेडचे आयसीयू केले. आता ते बेड विनावापर आहेत. तसेच व्हेंटिलेटरचाही वापर केला जात नाही. आयसीयू सुरू करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्‍यकता असते. ते महापालिकेकडे नाहीत. त्यामुळे आयसीयू असूनही ते केवळ दिखाव्यासाठी आहेत. कोरोनाकाळात दुसरीकडे दिलेले कर्मचारी परत देण्याची मागणी केली आहे. पण ज्या ठिकाणी त्यांना घेतले आहे, तिथून त्यांना सोडले जात नसल्याची चर्चा आहे.

आकृतीबंद मंजूर पण..
आयसोलेशन हॉस्पिटलसाठी ३४ पदांचा आकृतीबंद मंजूर आहे. त्यातील १७ पदे रिक्त आहेत. यात रुग्णांच्या सेवेसाठीचे ड्रेसर तसेच कार्यालयीन कामासाठी लिपिकांचीही पदे आहेत. त्याबाबत काहीच निर्णय घेतलेले नाहीत.

कोट
सध्या आयसोलेशनमध्ये कोविड व्यतिरिक्तचे रुग्ण घेण्यास सुरूवात झाली आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. गरजेप्रमाणे जादा डॉक्टर व कर्मचारी दिले जाणार आहेत.
- रविकांत आडसूळ, उपायुक्त

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83574 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..