७६ लाखाचा अपहारप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७६ लाखाचा अपहारप्रकरणी गुन्हा
७६ लाखाचा अपहारप्रकरणी गुन्हा

७६ लाखाचा अपहारप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

सफाई कामगार संस्थेत
७६ लाखांचा अपहार

तिघांवर गुन्हा दाखल : शासनाचा निधी केला हडप

सांगली, ता. ३ : येथील सफाई कामगार सहकारी संस्थेने व्यवसायासाठी घेतलेल्या ७६ लाखांचा अपहार केल्याबद्दल अध्यक्ष जीवन सदाशिव कोलप (रा. इनामधामणी), सचिव अरविंद पांडुरंग पाटील, कंत्राटदार सतीश बापूसो देसाई (रा. माळी कॉलनी, कोल्हापूर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. लेखापरीक्षक श्रेणी-१ दिलीप यशवंत एडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित जीवन कोलप, सचिव अरविंद पाटील आणि इतर संचालकांनी बारा वर्षांपूर्वी सांगलीत तरुण भारत स्टेडियमजवळील कामगार चाळ येथे सफाई कामगार सहकार संस्थेची स्थापना केली होती. संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग देण्याचा प्रस्ताव बनवला होता. शिराळा तालुक्यातील वाडी भागाई येथे नटबोल्ट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठवला होता. संस्थेने पहिल्या टप्प्यातील अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर इमारत उभी करण्यासाठी ७६ लाख रुपयांचे अनुदान शासनाने दिले होते. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर शासकीय परिपत्रकातील अटी-शर्तींचे पालन अध्यक्ष, सचिव व कंत्राटदाराने केले नाही. संचालक मंडळ कार्यरत असताना त्यांनी बँक खात्यातून व्यवहार केले. इमारतीसाठी प्राप्त झालेली रक्कम अध्यक्ष कोलप, सचिव पाटील, कंत्राटदार देसाई यांनी २०११ ते २०१५ या काळात परस्पर हडप केली.
संस्थेच्या लेखापरीक्षणात ७६ लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लेखापरीक्षक वर्ग-१ श्री. एडके यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अध्यक्ष, सचिव, कंत्राटदार या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिघांना अद्याप अटक करण्यात आली नसून शहर पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83606 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..