प्रशासकीय कामकाजाला येणार गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय कामकाजाला येणार गती
प्रशासकीय कामकाजाला येणार गती

प्रशासकीय कामकाजाला येणार गती

sakal_logo
By

प्रशासकीय कामकाजाला येणार गती
ई-गव्हर्नसचा वापर करण्याचा आदेश ः पत्रव्यवहार, आदेश आता ई-मेलद्वारे होणार

इचलकरंजी, ता. ३ ः महापालिका प्रशासन गतिमान करण्यासाठी प्रशासक सुधाकर देशमुख यांनी धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय शिस्तीबाबत सकारात्मक बदल झाला असतानाच आता कामकाज गतिमान होण्यासाठी पत्रव्यवहार व आदेशासाठी ई - गव्हर्नसचा वापर करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांचे स्वतंत्र नवीन ई-मेल आयडी कार्यान्वित केले आहेत. त्याद्वारे विविध विभागांमधील पत्रव्यवहार या माध्यमातून होणार आहेत. शिवाय विविध आदेश याद्वारेच पाठवले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करण्यासाठी आता अधिक सतर्क राहण्याची वेळ सर्वच विभागांवर आली आहे.
इचलकरंजी पालिकेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर एकूणच प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होताना दिसत आहे. कामकाजाची वेळ निश्‍चित असतानाही अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपस्थित रहात नव्हते. त्यासाठी प्रशासक देशमुख यांनी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. त्याचा धसका कर्मचाऱ्यांनी घेतला असून आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी गणवेश व ओळखपत्रासह दिसत आहेत. एकीकडे हा सकारात्मक बदल शहरवासीयांना सुखावणारा आहे. यापूर्वी नागरिक अनेक कामांसाठी आल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वेळेत भेटत नव्हते. आता मात्र ही गैरसोय दूर होताना दिसत आहे.
आता यापुढे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी संगणकीय वापरावर भर देण्याचा निर्णय श्री. देशमुख यांनी घेतला आहे. त्यासाठी ई-गव्हर्नसचा प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला आहे. याद्वारे आता प्रत्येक विभागांतर्गत पत्रव्यवहार अथवा आदेश ई-मेलद्वारे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाने स्वतंत्र ई-मेल आयडी विकसित केला आहे. या कार्यवाहीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता येणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. प्रत्येक विभागप्रमुखांचीही जबाबदारी वाढणार आहे. तसेच यावर होणारा खर्चही थांबणार आहे. याची कार्यवाही न केल्यास कारवाई करण्याचा इशारा श्री. देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83627 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top