
कालवडींना ब्रुसेल्स लस देण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेतून...
कालवडींना ब्रुसेल्स
लस देण्याचे आवाहन
पशुसंवर्धन विभागाची मोहीम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : जनावरांच्या प्रजनन संस्थेचा आजार म्हणून ब्रुसेल्सेसिस (सांसर्गिक गर्भपात) ओळखला जातो. हा आजार प्रामुख्याने गाई, म्हैस, शेळी, मेंढी इत्यादी जनावरांमध्ये आढळून येतो. आजार झाल्यास जनावरांचा गर्भपात होतो. तसेच तो संसर्गजन्य असल्याने व त्यावर उपचार होत नसल्याने लसीकरण हाच एक पर्याय आहे. त्यामुळेच पशुसंवर्धन विभागाने सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेल्सा) रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
शेतकऱ्यांचा संसार हा दुग्धव्यवसायावर चालतो. दुभते जनावर आजारी पडले, वा मृत झाले तर पशुपालकांना आर्थिक फटका बसतो. आजची कालवड ही उद्याची गाई असते. त्यामुळे अशा जनावराची अधिक काळजी घ्यावी लागते. कालवडीस या आजाराची लवकर लागण होते. ही लागण होवू नये म्हणून लसीकर मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये ४ ते ८ महिन्यांच्या वयोगटातील कालवडींना त्यांच्या आयुष्यात एकदाच ब्रुसेल्सा प्रतिबंधक लसीकरण केले जाते. ही लस पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ब्रुसेल्स हा आजार गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात होतो. आजार झाल्यास गर्भपात होतो. त्यामुळे जनावरांचे गुडघे, सांधे यामध्ये सूज येते व ते लंगडण्यास सुरुवात करते. वंध्यत्व आल्याने शेतकऱ्या फटका बसतो. हा आजार झालेल्या जनावराच्या शेजारी इतर जनावरे असतील तर त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा जनावरांना गोठ्यातून वेगळे करणे आवश्यक आहे.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83647 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..