आजरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
आजरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

आजरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

sakal_logo
By

आजरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
आजरा ः येथील आजरा कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला शाखेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. उपप्राचार्य दिलीप संकपाळ अध्यक्षस्थानी होते. प्रा. रमेश चव्हाण म्हणाले, ‘‘कला ही मानव्यशास्त्राची शाखा असून माणूस घडविण्याचे काम कलाशाखेतून अविरतपणे घडत आले आहे. या शाखेतून शासकीय सेवेत करिअर घडविता येते.’’ प्रा. संकपाळ यांनी कला शाखेचे महत्त्व विषद केले. या वेळी बारावी कला शाखेतील निकिता कांबळे, वैभव कांबळे, सुजल बटकडली, सुमन येडगे, श्‍वेता पोतनीस, पवन कांबळे, कसरझेबा चाँद यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा. विनायक चव्हाण, रत्नदीप पोवार, संदीप देसाई, अल्बर्ट फर्नांडिस उपस्थित होते. शोभा केंद्रे यांनी स्वागत केले. विठ्ठल हाक्के यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मल्लिकार्जुन शित्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सुवर्णा धामणेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल निर्मळे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83652 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..