जागतिक स्तनपान सप्ताह विशेष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक स्तनपान सप्ताह विशेष
जागतिक स्तनपान सप्ताह विशेष

जागतिक स्तनपान सप्ताह विशेष

sakal_logo
By

जागतिक स्तनपान सप्ताह विशेष स्तनपान फोटो

भुकेल्या जीवांना मिळाले दूध

जिजाऊ फाऊंडेशनने दिले नवजात बालकांना पोषणमूल्य फॉर्म्युला दूध
नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गाचा काळ. कोणी कोणाला भेटायचे नाही, त्यातही रुग्णालयात मदतीसाठी जाणे दूरच. अशावेळी सावित्रीबाई फुले रुग्णालयात एका मातेने बाळाला जन्म दिला, पण तिला काही कारणांनी ‘पान्हा’ फुटेना. बाळ जन्मल्यापासून सलग दोन ते तीन दिवस बाळाला दूध मिळावे, यासाठी रुग्णालयातील कर्मचारी वर्गाने प्रयत्न केले. दूध पावडरीच्या सॅचेटमधून बाळाची भूक तात्पुरती भागली. मात्र, पुढचा प्रश्‍न कायम होता, अशावेळी कोल्हापुरातील श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशन या बाळाला दूध देण्यासाठी सरसावले. आईला दूध येईपर्यंत फाऊंडेशनने सर्व पोषणमूल्ये असतील, असे फॉर्म्युला दूध पुरवले. त्यांची ही तळमळ पाहून मातेचे अश्रू अनावर झाले.
ही एक प्रातिनिधिक घटना. २०१९ च्या महापुरापासून श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशनने कित्येक बाळांना दुधाची सोय करून त्यांची भूक भागवली आहे. जन्मणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी मातेचं दूध गरजेचे असते. दुधात तानुल्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये समाविष्ट असतात. मात्र, काही वेळेस आई आजारी असेल, बाळाचा जन्म मुदतीपूर्वी झाला असेल, प्रसूतीनंतर काही अडचण निर्माण झाल्यास आईला बाळाला स्तनपान करता येत नसेल तर अशा परिस्थितीत बाळाला आईचे दूध मिळणे अशक्य होते, अशावेळी पावडरपासून फार्म्युला दूध देऊन श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशनतर्फे बाळाची भूक भागवली जाते.
दोनच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या सीपीआरमधील अमृतधारा ह्युमन मिल्क बँकमध्ये स्तनदा मातांनी अतिरिक्त दूध दान करावे, यासाठी फाऊंडेशनकडून प्रबोधनही केले जात आहे. दिवसभरातून चार स्तनदा मातांना त्या सीपीआरमधील मिल्क बँकेकडे दुधदानासाठी पाठवतात. हळूहळू ही चळवळ वाढेल आणि कोणतेही बाळ आईच्या दुधाला मुकणार नाही, अशी आशा फाऊंडेशनचे कार्यकर्ते व्यक्त करतात. यंदाच्या स्तनपान सप्ताहानिमित्त त्यांनी खासगी दवाखान्यांतही जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

कोट
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ जन्मल्यानंतर पाहिल्या तासापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत आईच्या स्तनपानावर वाढले पाहिजे. त्यानंतर, पुढील निदान दोन वर्षांपर्यंत आईच्या दुधासोबत पूरक असे बाह्य अन्न त्याला मिळावे. तरच, त्याची सुदृढ वाढ होऊ शकते. मात्र, काही कारणांनी मातेला दूध देणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत बाळाला सर्व पोषक घटक असतील, असे फार्म्युला दूध सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि सीपीआरमधील गरजू बालकांना पुरवतो.
- साक्षी पन्हाळकर, श्रीमंत जिजाऊ फाऊंडेशन.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83665 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..