जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा दणका
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा दणका

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा दणका

sakal_logo
By

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा दणका
पिकांना जीवदान; शहरात अनेक ठिकाणी तुंबले पाणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शहरासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणी आज सायंकाळी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस झाला. शहरात नेहरुनगरात नारळाच्या झाडावर वीज पडून झावळ्या जळाल्या. काही ठिकाणी वीज खंडित झाली. दिवसभर ऊन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असे चित्र होते. आठवडाभर दडी मारलेल्या पावसाची आज हजेरी शेतकऱ्यांना दिलासादायक ठरली. कोल्हापूर शहरात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले. शाळा सुटतानाच पाऊस वाढल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.
वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण होते. जमिनींना भेगा पडण्यास सुरवात झाली होती. आजचा पाऊस पिकांना तग धरण्यासाठी महत्त्वाचा ठरला. कसबा बावडा येथे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आज रात्री आठ वाजता११ फूट पाच इंच इतकी होती. चोवीस तासांत ती सहा इंचाने कमी झाली आहे. राधानगरी धरण सध्या ६१.६२ टक्के भरले आहे. राधानगरी धरणातून ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी बंधारा पाण्याखाली आहे.

पुढील चार दिवस मुसळधार
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवमान विभागाने व्यक्त करत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

2637
हातकणंगले ः पावसाने बांधकाम सुरू असलेल्या येथील रेल्वे पुलाखाली पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले.

रेल्वे पुलाखाली तळे
हातकंणगले ः पावसाने हातकणंगले आणि परिसराला दुपारनंतर तीन तास झोडपले. जनजीवन विस्कळीत झाले. गेले दहा महिने हातकणंगले-इचलकरंजी मार्गावर रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. आजच्या पावसाने त्या परिसराला त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83685 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top