
मुक्त सैनिक वसाहत
फोटो देत आहे.
अन्यथा पावसाच्या पाण्यात आंदोलन
राजसिंह शेळके : मुक्त सैनिकमधील समस्येबाबत इशारा
कोल्हापूर, ता. ३ : तीन-चार तास झालेल्या पावसाने मुक्त सैनिक वसाहत, इरा गार्डन परिसरात दीड दोन फूट पाणी साचले. तलावच तयार झाल्याने परिसरातील अनेकांच्या घरात, इमारतीत, अंगणात पाणी गेले. सहा वर्षे पाठपुरावा करून महापालिकेच्या दुर्लक्षाबद्दल परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आठ दिवसांत येथे पावसाच्या पाण्याची निचरा करण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा परिसरातील नागरिक व कुटुंबासह साठलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक राजसिंह शेळके यांनी दिला.
सहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात मुक्त सैनिक वसाहत, काटे मळा भागात पाणी साचत नव्हते. दहा वर्षांत भागात इमारती झाल्या. अपार्टमेंट झाले, तसेच नाल्यांची वाट अडवली. नाल्याच्या परिसरात भराव टाकून नाला वळविला. याच भागात एका हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. त्या बिल्डरनेही विद्या कॉलनी परिसरातून येणारा नाला काटकोनात वळवला आहे. हे महापालिका अधिकाऱ्यांना माहिती आहे, तरीही याबाबत हरकत घेतली नाही.
२०१९ व २०२१ ला आलेल्या महापुरात पाच दिवस परिसरात पाण्याची फूग होती. पन्नासवर इमारती, दीडशेवर कुटुंबाना महापुराचा फटका बसला.
कावळानाका, सदर बाजार, विचारे माळ, पाटोळेवाडी, रुईकर कॉलनी, विद्या कॉलनी परिसरातील नाल्यातून येणारे पाणी मुक्त सैनिक वसाहत भागात साचून राहते. नाल्याकडेला ठिकठिकाणी इमारत बांधकामवेळी टाकलेल्या भरावामुळे नाले अरूंद झाले. परिणामी पावसात मुक्त सैनिक वसाहत परिसरात पाणी साचले. त्यामुळे चार रस्ते बंद झाले. दरम्यान, शहर उपअभियंता हर्षजित घाटगे यांच्याशी संपर्क साधला अशात बोलणे होऊ शकले नाही.
चौकट
‘‘मुक्त सैनिक वसाहतीत पावसाळ्यात साचणारे पाणी दूर व्हावे, यासाठी उपाययोजना करावी, याविषयी पाठपुरावा केला. आयुक्तांनीही पाहणी केली. आश्वासन दिले पण प्रत्यक्ष काम केले नाही. त्यामुळे थोड्याशा पावसाने पाणी परिसरात अर्धा किलो मीटरात साचून राहिले आहे. या पाण्यातच आंदोलन करणार आहोत.
- राजसिंह शेळके, माजी नगरसेवक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83688 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..