कोल्हापूरचे प्रभाग ८१ हून अधिक शक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरचे प्रभाग 
८१ हून अधिक शक्य
कोल्हापूरचे प्रभाग ८१ हून अधिक शक्य

कोल्हापूरचे प्रभाग ८१ हून अधिक शक्य

sakal_logo
By

कोल्हापूरचे प्रभाग
८१ हून अधिक शक्य
कोल्हापूर ः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आज राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेची नगरसेवक संख्या ९२ वरून ८१ होऊ शकते. या निर्णयामुळे आता झालेली प्रभागरचना, आरक्षण सोडत, मतदार यादींची विभागणी सारेच रद्द होणार आहे. एक सदस्यीय की चार सदस्यीय प्रभागरचना होणार याबाबतची स्पष्टता नाही. एकसदस्यीय झाल्यास ८१, तर चारसदस्यीय प्रभाग झाल्यास २१ प्रभाग होऊ शकतील. त्याबाबत अधिसूचनेनंतर स्पष्टता येईल. सध्या जरी सरकारने निर्णय घेतला असला तरी तो कोणाला लागू होणार, यावर बरेच अवलंबून आहे. त्यानंतरही न्यायालयीन प्रक्रियेतून काय निर्णय होणार, यावर पुढील वाटचाल ठरणार आहे.
महापालिकेचा कार्यकाल २०२० मध्ये संपल्यावर विविध प्रकारचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. त्यामुळे एकसदस्यीय, त्रिसदस्यीय प्रभागरचना, ओबीसीशिवाय आरक्षण, ओबीसीसह आरक्षण, मतदार यादीचा कार्यक्रम अनेकदा झाला. आज मंत्रिमंडळाने लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेतील नगरसेवकांची संख्या निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन लाखांपेक्षा अधिक व सहा लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५, तर कमाल संख्या ८५ असेल. तीन लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवकाची तरतूद करण्यात येईल. हा निर्णय कोल्हापूर महापालिकेला लागू झाला तर कार्यक्षेत्रातील लोकसंख्या पाच लाख ४९ हजार २३६ इतकी आहे. त्यामुळे तीन लाखांपर्यंत ६५ नगरसेवक होतील. त्यानंतरच्या दोन लाख ४९ हजार २३६ लोकसंख्येसाठी प्रत्येकी पंधरा हजार लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे १६ नगरसेवक होतील. त्यामुळे नगरसेवकांची संख्या ८१ होईल.

सारा डाव नव्याने
नगरसेवकांच्या संख्येबाबत स्पष्ट आदेश असला, तरी प्रभागरचना कशी होणार, याबाबत स्पष्टता नाही. राज्य सरकारने २०१७ मध्ये घेतलेल्या निर्णयाप्रमाणे प्रभागरचना राहील, असे सांगितले जात आहे. त्यानुसार चारसदस्यीय प्रभाग होतील, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास २१ प्रभाग होतील. नगरसेवक संख्या, प्रभागरचना बदलली तर पूर्ण प्रक्रियाच नवीन राबवावी लागणार आहे. त्यात बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सांगितली असल्याने राज्य सरकारने घेतलेले निर्णय कोणाला लागू होणार, यावर पुढील कार्यवाही अवलंबून राहील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83716 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..