रस्ते पॅचवर्’क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ते पॅचवर्’क
रस्ते पॅचवर्’क

रस्ते पॅचवर्’क

sakal_logo
By

40635

रस्ते पॅचवर्कची कामे
२५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा

प्रशासक डॉ. बलकवडे; गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक

कोल्हापूर, ता. ३ : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शहर अभियंत्यांना दिल्या. आयुक्त कार्यालयात उत्सवाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेण्यात आली.
प्रशासक डॉ. बलकवडे यांनी उत्सवाच्या अनुषंगाने ज्या काही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत, त्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गणेश आगमन, मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी वीज बंद असल्यास तातडीने सुरू करावी, तसेच ज्या ठिकाणी मंडप व बॅरिकेडिंगची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी वार्षिक ठेकेदारामार्फत काम करून घेण्याच्या सूचना दिल्या. विभागीय कार्यालय व आरोग्य विभाग यांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवून खरमाती व कचरा उठाव करावा, उत्सवापूर्वी येणाऱ्या शनिवारी व रविवारी विशेष मोहीम राबवावी, तसेच विसर्जनाचे नेटके नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी चारही विभागीय कार्यालयाअंतर्गत पॅचवर्कचे अंदाजपत्रक तयार केले असून लवकरच कामाला सुरवात करणार असल्याचे सांगितले. घरगुती व सार्वजनिक गणपती कुंडापासून इराणी खणीपर्यंत नेण्यासाठी ९० टेम्पो व २० ट्रॅक्टरची प्रत्येकी २ प्रमाणे १८० कामगारांसह व्यवस्था करण्यात आली असल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, नारायण भोसले, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83737 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top