शहर सौंदर्यीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहर सौंदर्यीकरण
शहर सौंदर्यीकरण

शहर सौंदर्यीकरण

sakal_logo
By

40639

शहर सौंदर्यीकरण अभियानासाठी समिती
पहिल्या बैठकीत ट्रॅफिक आयलँड सुशोभीकरणासह अन्य कामांना मंजुरी

कोल्हापूर, ता. ३ : नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शहर सौंदर्यीकरण अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने समितीची स्थापना केली आहे. मध्यवर्ती चौकांची स्वच्छता, सुशोभीकरण, जनजागृतीची चित्रे रेखाटणे, ट्रॅफिक आयलँड सुशोभीकरण, सेल्फी पॉईंटची निर्मिती व सूचना फलक, चिन्ह फलक, दिशादर्शक फलक यांच्यात एकसूत्रीपणा व रंगसंगती करण्याचे निर्णय या समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आले.
नवीन समितीचे अध्यक्ष आयुक्त असून, सदस्यांमध्ये शहर अभियंता, नगररचनाचे सहाय्यक संचालक, मुख्य आरोग्य निरीक्षक, क्रीडाई अध्यक्ष, शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य, आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष, आर्किटेक्टस्, कला निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे शाखा प्रमुख, आयुक्तांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त आयुक्त व विशेष निमंत्रित म्हणून न्यू कॉलेज ऑफ आर्किटेक्टचे प्राचार्य, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टचे प्राचार्य, महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. पुढील आठवड्यात दुसरी बैठक घेण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, नारायण भोसले, एन. एस. पाटील, बाबूराव दबडे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, कनिष्ठ अभियंता सतीश फप्पे, अनुराधा वांडरे, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, कोल्हापूर आयटीआयचे एस. के. पाटील, कलानिकेत महाविद्यालयाचे मंगेश शिंदे, इंजिनिअर कन्स्टल्टंटचे आर्किटेक्ट प्रिया देशपांडे, केआयटी कॉलेजचे प्रा. शीतल वरुर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83750 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top