डेंगी तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी तपासणी
डेंगी तपासणी

डेंगी तपासणी

sakal_logo
By

शहरात १०१ घरांत डासअळ्या
कोल्हापूर, ता. ३ : महापालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून शहरातील १५४१ घरांची तपासणी केली. त्यात १०१ घरांत डासअळ्या सापडल्या. ३४३४ कंटेनरपैकी ११३ कंटेनर दूषित आढळले. ८१ कंटेनरमध्ये टेमिफॉसचे द्रावण टाकण्यात आले.
सर्वेक्षण मस्कुती तलाव, दत्त मंदिर, मठ गल्ली, गुणे बोळ, बापट गल्ली, गंगावेश, निर्माण चौक, पाडळकर वसाहत, टेंबलाईवाडी परिसर, बागवान गल्ली, भुई गल्ली, शहाजी वसाहत, राजाराम चौक, लालबहादूर गार्डन परिसर, सणगर गल्ली, जैन गल्ली, सुनंदा पार्क, महालक्ष्मी पार्क, मुक्ताईनगर, बळवंत नगर या ठिकाणी करण्यात आले.
घरामध्ये वापरासाठी भरून ठेवलेले पाण्याचे कंटेनर व भांडी आठवड्यातून एकवेळा कोरडी करून स्वच्छ ठेवावीत. नारळाच्या करवंट्या, वापरात नसलेले डबे, टायर यांची वेळीच विल्हेवाट लावावी. झाडांच्या कुंड्या, फ्रीजमागील ट्रेमध्ये पाणी साचू देऊ नये. तापाच्या रुग्णांनी सरकारी रुग्णालयात जाऊन औषधोपचार घ्यावा. रक्त नमुने घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83755 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..