
शेकापचा वर्धापनदिन उत्साहात
40650
शेकापचा ७४ वा वर्धापनदिन
ध्वजवंदनाचा कार्यक्रम; ॲड. गिरीश खडके, प्रमोद कदम यांचा सत्कार
कोल्हापूर, ता. ३ : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदीना निमित्त शेकाप शहर आणि जिल्हा कार्यकारणीतर्फे टेंबे रोड येथील पक्षाच्या कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले. ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेतला. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीष खडके आणि सिटी क्रिमीनल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ॲड. प्रमोद कदम यांची निवड झाल्याबद्द्ल शहर चिटणीस बाबुराव कदम यांच्या हस्ते सत्कार झाला; तर विद्यार्थ्यांना पक्षाच्या वतीनं शालेय साहित्याचे वाटप केले. अतुल दिघे, भरत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाल शुभेच्छा दिल्या. प्रा. संजय साठे, प्रा. लिला पाटील यांनी वर्धापनदिनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शाहीर रंगराव पाटील, शाहीर सखाराम चौगले यांचा शाहीरीचा बहारदार कार्यक्रम घेतला. संभाजी जगदाळे, कुमार जाधव, प्राचार्य जी. पी. माळी, संग्राम माने, भारत पाटील, राजाराम मगदूम, सुभाष सावंत, प्रिया जाधव, योगिता पाटील, प्रमोदिनी जाधव, लता कांदळकर, वैशाली सूर्यवंशी, गीता जाधव, मधुकर हरेल, रुपाली नारे, प्रकाश शिंदे, मनोहर पाटील, अभिजित कदम, सुनंदा मारे, शिवाजी पाटील, दमयंती कोडकर, सुभाष सावंत, एल. आर. पाटील, कावेरी मोटनवर याच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83759 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..