
नॅनो सायन्स विद्यार्थी इस्त्रोला रवाना
४०६५३
नॅनो सायन्सचे विद्यार्थी
निघाले इस्त्रोच्या भेटीवर
एक वर्षांचे प्रशिक्षण; प्र-कुलगुरूंनी दिल्या शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे दहा विद्यार्थी आज भारतीय अवकाश संशोधन संस्थेसह (इस्रो) विविध आघाडीच्या नामांकित संशोधन संस्था व कंपन्यांमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी रवाना झाले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठातच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या पाच वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या अखेरच्या अर्थात पाचव्या वर्षी विद्यार्थ्यांना पूर्ण एक वर्षाचा संशोधन प्रकल्प किंवा विविध कंपन्यांत प्रशिक्षण करावयाचे असते. त्याअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्या निवड यादीत एकूण दहा विद्यार्थ्यांची संशोधन प्रकल्प तसेच कंपनी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी स्कूल ऑफ नॅनोसायन्सचे माजी संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या संधीचा आपली कारकीर्द घडविण्यासाठी पुरेपूर वापर करावा, अशा शब्दांत प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी सदिच्छा दिल्या. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा आणि अधिविभागातील वरिष्ठ संशोधक सहयोगी डॉ. शरद पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची नावे अशी
इस्रो (बेंगलोर) - साक्षी निगवेकर, एन.सी.एल., पुणे : अबोली शिंदे, अमित बिरजे, मृदुला धेंडे, रिना सौबम, विनायक निर्मळे.
केमसाय इनोव्हेशन, (पुणे) - अभिलाषा देशपांडे, प्रतीक्षा भागनगोल, ऋतुजा चौगुले.
प्रो-केअर क्रॉप सायन्स (सांगली) - सृष्टी काडगे. या विद्यार्थ्यांना अधिविभागातील अॅडजंक्ट प्राध्यापक डॉ. प्रकाश वडगांवकर (मानद शास्त्रज्ञ, सीएसआयआर-एनसील, पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83780 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..