मनपा शववाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा शववाहिका
मनपा शववाहिका

मनपा शववाहिका

sakal_logo
By

40660


... आणि नादुरुस्त
शववाहिकेस धक्का
मंगळवार पेठेत घटनेने नागरिक संतप्त
कोल्हापूर, ता. ३ ः महापालिकेची शववाहिका नादुरुस्त होण्याचा प्रकार आज मंगळवार पेठेत झाला. मृतदेह ठेवलेली शववाहिका सुरू झाली नसल्याने नागरिकांना ती ढकलून सुरू करावी लागली. यामुळे महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना समोर आला.
मंगळवार पेठेतील शिंगोशी मार्केट परिसरात एक मृतदेह अंत्यसंस्काराला नेण्यासाठी शववाहिका आली होती. नातेवाईक, नागरिकांनी घराजवळील विधी आटोपून अंत्ययात्रा शववाहिकापर्यंत आणली. मृतदेह वाहिकेत ठेवल्यानंतर ती सुरू करण्याचा प्रयत्न वाहकाने केला. पण ती सुरू होईना. शेवटी नागरिकांना मृतदेह वाहनातच ठेवून शववाहिकेला ढकलून सुरू करावे लागले. या प्रकाराने संतप्‍त नागरिकांनी चालकाला खडे बोल सुनावले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला. काहींनी तो उपायुक्त रविकांत आडसूळ यांनाही पाठवला. त्यांनी शववाहिका दुरुस्त करून घेण्याचे आश्‍वासन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83786 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top