सुरुते येथे शिक्षकांकडून काजूच्या रोपांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरुते येथे शिक्षकांकडून काजूच्या रोपांचे वाटप
सुरुते येथे शिक्षकांकडून काजूच्या रोपांचे वाटप

सुरुते येथे शिक्षकांकडून काजूच्या रोपांचे वाटप

sakal_logo
By

40764
सुरुते ः ग्रामस्थांना काजूच्या रोपांचे वाटप करताना राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक शशिकांत सुतार.

सुरुते येथे शिक्षकांकडून
काजूच्या रोपांचे वाटप
चंदगड ः सुरुते (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत सुतार यांनी स्वखर्चातून ग्रामस्थांना काजूच्या रोपांचे वाटप केले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. त्याचवेळी आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी झाडे लावल्यास शेतकऱ्यांकडून त्याची जोपासना चांगली होते हा हेतू ठेवून त्यांनी या रोपांचे वाटप केले. सरपंच मारुती पाटील, सदस्य नारायण चोपडे, मलाप्पा पाटील, वैजू भाटे, देवाप्पा आपटेकर आदींनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. सरपंच पाटील म्हणाले, ‘‘सुतार हे नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्यांच्याच प्रयत्नातून शाळेत शैक्षणिक उठावातून अनेक भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. एप्रिल व मे महिन्यात सुटीचा कालावधी असतानाही लोकवर्गणीतून ८६ हजार रुपये खर्चून स्वच्छतागृहाची उभारणी केली. त्याला देणगीतूनच पाण्याची टाकीही बसवली.’’ कृष्णा भुजबळ यांच्या हस्ते या सर्व कामांचे उद्‍घाटन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरमू आपटेकर, उपाध्यक्ष अवधूत भुजबळ, हणमंत बोंगाळे, ग्रामसेवक दीपक कांबळे, मुख्याध्यापक नामदेव चौगुले, बाबू चौगुले, तुकाराम चौगुले, पांडुरंग बेकवाडकर, प्रताप झाजरी, अजय पाटील, तन्वी देसाई उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83914 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..