पाणी निर्गत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी निर्गत
पाणी निर्गत

पाणी निर्गत

sakal_logo
By

40810

पावसाच्या पाण्याचा निचरा करा
-
‘मुक्त सैनिक, लिशा हॉटेल’ परिसरातील नागरिकांची मागणी

कोल्हापूर, ता. ४ ः पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही, त्या पाण्याबरोबर सांडपाणी घरात येते. नागरिकांची गैरसोय होते, शिवाय रस्ते लवकर खराब होतात. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार मुक्तसैनिक वसाहत, लिशा हॉटेल परिसरातील नागरिकांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. या वेळी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.
युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीमनगर, नारायण हौसिंग सोसायटी परिसरात काल झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही.
त्यामुळे शिष्टमंडळाने ‘सकाळ’ मधून प्रसिद्ध झालेल्या बातम्या दाखवत उपाययोजनेची मागणी केली. माजी नगरसेवक मुल्लाणी यांनी क्रॉसड्रेन साफ करण्याबरोबरच एका ठिकाणी घातलेले नळेही स्वच्छ करावेत. एका इमारतीखालून जाणाऱ्या नाल्याबाबत उपाययोजना केली तर ५० टक्के प्रश्‍न संपुष्टात येईल, असे सांगितले. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच सांडपाणी साचत असल्याचा आरोपही केला.
उपायुक्त रविकांत आडसूळ, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, इस्टेट विभागाचे सचिन जाधव, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सचिन घोरपडे, स्वप्‍नील कांबळे, आप्पा कांबळे, सुशील कालगे, उदय फाळके, डी. एम. कोठावळे, अब्दुल मुल्ला, असीफ फरास, सुभाष सावंत, भूषण कळंत्रे, भागेश इंगवले, रणजित सिंह, जमीलखान पठाण आदी उपस्थित होते.
-
पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना
करा : आमदार जयश्री जाधव
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, ड्रेनेज सफाई करूनही, पाणी का साचून राहते? असा सवाल आमदार जयश्री जाधव यांनी केला. पावसाळ्यापूर्वी अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. तेव्हाच पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना दिली होती. प्रशासनाकडून योग्य काम झालेले नाही. नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणी का साचून राहते, याचा शोध घेऊन निचरयासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याची त्वरित अंमलबजावणी करा असेही सांगितले. नागरिकांच्या तक्रारी पुन्हा येऊ नयेत अशी सक्त सूचनाही आमदार जाधव यांनी केली. प्रशासन कारवाई करेल असे आश्वासन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83976 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..