‘गडहिंग्लज अर्बन’ रिझर्व्ह बँकेच्या बंधनातून मुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गडहिंग्लज अर्बन’ रिझर्व्ह बँकेच्या बंधनातून मुक्त
‘गडहिंग्लज अर्बन’ रिझर्व्ह बँकेच्या बंधनातून मुक्त

‘गडहिंग्लज अर्बन’ रिझर्व्ह बँकेच्या बंधनातून मुक्त

sakal_logo
By

40812
गडहिंग्लज : अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत बोलताना बाळासाहेब घुगरे. शेजारी दत्तात्रय बरगे, एम. एल. चौगुले व सर्व संचालक.

‘गडहिंग्लज अर्बन’ रिझर्व्ह
बँकेच्या बंधनातून मुक्त
अध्यक्ष घुगरे; चौगुलेंचे अभिनंदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : गडहिंग्लज अर्बन बँकेला गेल्या वर्षभरात एका संकटाला सामोरे जावे लागले. रिझर्व्ह बँकेने बंधने घातली. परंतु, त्याने न खचता त्यातून विविध उपाययोजनेद्वारे मार्ग काढला. यामुळे अत्यंत कमी कालावधीत रिझर्व्ह बँकेच्या बंधनातून मुक्त होणारी ही एकमेव बँक आहे. यासाठी विशेषत: रवळनाथ को-ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा अर्बनच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एम. एल. चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या बहुमोल योगदानामुळे हे शक्य झाल्याचे मत अध्यक्ष बाळासाहेब घुगरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सभासद सुभाष चराटी यांनी रवळनाथचे संस्थापक एम. एल. चौगुले यांनी बॅंकेसाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा मांडलेला ठराव मंजूर झाला. अडचणीच्या काळात प्रतिसादाबद्दल ठेवीदारांचे घुगरे यांनी आभार मानले. बँकेची ७२ वी वार्षिक सभा जडेयसिद्धेश्‍वर आश्रम सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी घुगरे होते. प्र. जनरल मॅनेजर सुनील हत्ती यांनी मयत सभासदांचा श्रद्धांजलीचा ठराव मांडला. संचालक राजेंद्र तारळे यांनी स्वागत केले. ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांसह दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या सभासद पाल्यांचा गौरव झाला. रवळनाथचे संस्थापक एम. एल. चौगुले यांनी अर्बन बँकेत सभासदांनी पुनश्‍च व्यवहार सुरू करून प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन करून बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालू असल्याचे सांगितले. बँकेच्या अमृतमहोत्सवापर्यंत २५० कोटींचा ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याचेही आवाहनही त्यांनी केले. नूतन जनरल मॅनेजर सुनील बावण्णावर यांनी ठरावाचे वाचन केले.
प्रितम कापसे व राहुल शिरकोळे यांनी भागभांडवल वाढवायचे असेल तर कोणत्याही सभासदाचे शेअर्स रक्कम परत करु नये व मयत सभासदांच्या वारसांच्या नावे शेअर्स वर्ग करण्याचा ठराव मांडला. सभासद चंद्रकांत मेवेकरी यांनी १३ कोटींच्या गैरव्यवहारात सर्व चौकशी यंत्रणांनी तत्कालीन जनरल मॅनेजर किरण तोडकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्याकडून रक्कम वसुलीचा मांडलेला ठराव मंजूर केला. संचालिका शारदा आजरी यांनी आभार मानले. सहायक सरव्यवस्थापक संजय पाटील व प्रशांत देसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष दत्तात्रय बरगे, संचालक, सभासद, व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83996 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..