पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

पोलिस निरीक्षक संतोष जाधव
यांची पुणे ग्रामीणला विनंती बदली
कोल्हापूर ः लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांची पुणे ग्रामीणला बदली झाली. सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांची कोल्हापुरला बदली झाली. दोन्ही अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. जाधव यांनी सहा डिसेंबरला लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. सिंदकर यांनी तीन वर्षे सांगली शहर, दीड महिने ते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत.

01600
गव्यांकडून भातपिकांचे नुकसान
पिंपळगाव ः भेंडवडे (ता. भुदरगड) येथे गव्यांच्या कळपाने धुडगूस घालून भात पिकांचे नुकसान केले आहे. शेतकरी बाळू सिध्दू धुमाळ यांचे भात पीक खाऊन नुकसान केले आहे. सध्या पावसाअभावी पिके कोमेजू लागली आहेत. यातच गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे या मुळे भात पिकाचे नुकसान होत आहे. हुमणीचाही भात पिकावर परीणाम होऊ लागला आहे. जंगली प्राण्यांच्या उपद्रव्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. मुरुक्टे (ता. भुदरगड) येथील तानाजी दत्तू काटे यांच्या भातपिकाचेही गव्यांनी नुकसान केले आहे.

वाहतुकीस अडथळा; चौघांवर गुन्हा
कोल्हापूर ः स्टेशनरोड आणि ताराबाई पार्क या रहदारीच्या मार्गावर चारचाकी उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी चौघा चालकांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद केला. त्याचबरोबर मद्यप्राशन करून मोटारसायकल चालविणाऱ्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला.

३०४०
राधानगरीत युवकाची आत्महत्या
राधानगरी ः येथील राहूल शामराव चांदम (वय २४) या युवकाने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली. याची राधानगरी पोलिसात नोंद झाली आहे. राहुल याने गुरुवारी रात्री राहत्या घरी छताच्या पाइपला साडी बांधून गळ्याला फास घेऊन आत्महत्या केली. त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वडिलांचे आजारपण आणि नोकरीधंदा नसल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. त्याच्या मागे वडील, भाऊ असा परिवार आहे.

खून प्रकरणी संशयिताला कोठडी
जयसिंगपूर : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील चंपाबाई ककडे यांचा खून करून दागिने लंपास केल्याची घटना ३० जुलैला घडली होती. याप्रकरणी प्रकाश ऊर्फ मुन्ना लक्ष्मण नंदीवाले (वय ३२, नंदीवाले वसाहत शिरोळ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाने अटक केली आहे. आज त्याला येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

गव्याच्या धडकेत शेतकरी जखमी

कोल्हापूर ः सावरेवाडी (ता. शाहूवाडी) येथे गव्याच्या धडकेत शेतकरी जखमी झाला. मारुती पांडुरंग सावरे (वय ४५) असे जखमींचे नाव आहे. ते आज सकाळी पायरीचा माळ नावाच्या शेतात पिकाला पाणी सोडत होते. त्यावेळी गव्याने त्यांना धडक दिली. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y83997 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top