मुर्तींच्या रंगकामांची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुर्तींच्या रंगकामांची लगबग
मुर्तींच्या रंगकामांची लगबग

मुर्तींच्या रंगकामांची लगबग

sakal_logo
By

40827
साळगाव (ता. आजरा) ः येथे साकारलेल्या गणेश मूर्ती.


मूर्तींच्या रंगकामांची लगबग
मूर्तिकार कामात मग्न; जल्लोषात होणार स्वागत, तयारीसाठी मंडळांच्या बैठका
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ : गणरायाच्या आगमनासाठी तालुक्यात आबाल वृद्धांमध्ये उत्साह आहे. गत दोन वर्षांत कोरोनामुळे या उत्साहाला मर्यादा आल्या होत्या. यंदा मात्र कोरोनाचे सावट दूर झाल्याने गणरायाचे जल्लोषी स्वागत होणार आहे. यासाठी तालुक्यात गणरायाच्या मूर्ती बनवण्यासाठीची लगबग सुरू आहे. मूर्तिकार मूर्ती कामात मग्न असून, रंगरंगोटीलाही सुरवात झाली आहे.
तालुक्यात दरवर्षी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. साऱ्यांनाच गणरायाच्या आगमनाची उत्सुकता लागून रहिलेली असते. मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवात काहीसी मरगळ होती. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही सदर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही, मात्र या वर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. तालुक्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तिकारांकडे श्री मूर्तीची नोंदणी केली आहे. घरगुती गणेशाच्या मूर्तीसाठीही मोठ्या प्रमाणात मूर्तिकारांकडे मागणी होत आहे. पावसाने उघडीप दिल्याने मूर्तिकारावरील मूर्ती वाळवण्यासाठी लागणारे कष्ट थोडेफार कमी होणार आहे. विविध आकारांच्या, आकर्षक व सुंदर रेखीव काम केलेल्या मूर्ती साकारल्या जात आहेत. वाळलेल्या मूर्तींच्या रंगकामाला सुरवात झाली आहे. गणेशोत्सवाला पंचवीस दिवस उरले असल्याने मूर्तिकामासाठी कुंभारवाड्यात लगबग दिसून येत आहे. कुंभार कुटुंबातील कलाकार रात्रंदिवस मूर्ती काम व रंगकामात गुंतले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात कोण कोणते उपक्रम राबविले जाणार याविषयी बैठका सुरू आहेत. एकंदरीतच यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्याची तयारी सुरू आहे.
------------------
चौकट
मूर्तींचे दर वाढणार
यंदाही रंगाच्या दरात व मूर्तीच्या अन्य साधनसामग्रीमध्ये वाढ झाल्याने श्री मूर्तीचे दर चार टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या खिशाला चाट बसणार आहे.
--------------
पर्यावरणपूरक उत्सवावर भर
यंदा शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे यंदा शाडू मूर्ती बनवण्यावर भर कलाकारांनी दिला आहे. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा होण्याकडे कल आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y84021 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top